Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पुणे सोलापूर डेमोचा यवत स्टेशन ला थांबा द्या- उपसरपंच सुभाष यादव यांनी रेल्वे प्रशासनाकडे धाव.

पुणे जिल्हा ग्रामीण विभागीय संपादिका दिपाली दिवेकर ऍक्टिव्ह मराठी न्यूज

0 1 4 7 2 7

पुणे सोलापूर डेमोचा यवत स्टेशन ला थांबा द्या- उपसरपंच सुभाष यादव यांनी रेल्वे प्रशासनाकडे धाव.

(अँक्टिव्ह मराठी) पुणे जिल्हा विभागीय संपादिका दिपाली दिवेकर. दिनांक 6 डिसेंबर
यवत- यवत रेल्वे स्टेशन हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे स्टेशन मानले जाते.यवत व परिसरातून असंख्य प्रवासी नोकरीसाठी किंवा इतर कामांसाठी दररोज रेल्वे ने प्रवास करत असतात.यवत रेल्वे स्टेशनमध्ये असणाऱ्या असुविधा यांमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावे लागतात.रेल्वे स्टेशनवर असलेल्या असुविधा बद्दल चीफ कमर्शिअल इन्स्पेक्टर (CCI) मृत्युंजय कुमार यांच्या बरोबर यवत रेल्वे स्टेशन मध्ये रेल्वे सल्लागार समिती तर्फे मीटिंग आयोजित करण्यात आली होती. रेल्वे सल्लागार समिती तर्फे सुभाष यादव, युवराज मेहता, बाळासाहेब लाटकर, स्टेशन मॅनेजर संप्रेंदर कुमार ह्यांच्या मार्फत प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. सोलापूर डेमो स्टॉप मिळण्या बाबत तसेच रेल्वे स्टेशन मध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कॅमेरा बसवणे, अनाउन्समेंट सिस्टीम बसवणे,वेटींग रुममध्ये पंखे बसवणे,लाईट व रेल्वे स्थानकावर शौचालयाची सुविधा नसून नवीन शौचालये बांधणे. कोरोना कालावधीत बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत करण्याबाबत निवेदन देण्यात आले. तसेच पुणे सोलापूर डेमो चालू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.यावेळी उपसरपंच सुभाष यादव,युवराज मेहता,बाळासाहेब लाटकर,राहुल चव्हाण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

1/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे