राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट…
राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट…

अहिल्यानगर येथील दिव्यांगाचे थकलेले संजय गांधी निराधार योजनेचे मानधन त्वरित मिळणेबाबत .
अहिल्यानगर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे दिव्यांगाचे सुमारे चार महिन्याचे अनुदान थकलेले आहे . ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा व्हावे अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देण्यात आले . तसेच अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेल चे अध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांनी निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात रू १५०० वरून ३०००रु वाढ करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने सादर करत आहे. करण आजच्या महागाईच्या काळात संजय गांधी निराधार योजनेत वाढ होणे गरजेचे आहे . महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेचे मानधन फक्त १५०० रुपये मिळते , ज्यामध्ये दिव्यांग बांधव आपला स्वतःचा ऊदर निर्वाह करू शकत नाही .
महाराष्ट्र राज्यामध्ये यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे मानधन १००० मिळत होते . त्यावेळेस आंध्र प्रदेश राज्यातील दिव्यांग बांधवांना प्रति महिना ३००० रु तेवढे मानधन मिळत होते . आता पुन्हा नव्याने स्थापन झालेल्या माननीय श्री चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या आंध्र प्रदेश सरकारने आंध्र प्रदेश राज्यातील दिव्यांग बांधवांच्या संजय गांधी निराधार योजनेत पुन्हा ३००० रु वाढ केली आहे . ६००० रु संजय गांधी निराधार योजनेचे मानधन मिळणार आहे . दादा आपण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांच्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये रुपये १५०० वरून ३००० रू वाढ करण्याचा निर्णय घेवा ही विनंती . दिव्यांगांना उद्योगधंद्यासाठी ज्या ई रिक्षा देत आहेत . त्याची दर महिन्याला सोडत निघावी . अशा प्रकारचे निवेदन अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेल चे जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांच्या वतीने मा .उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना देण्यात आले . अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर.









