शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या बेलेट पेपरवर राहणार १५ उमेदवार…
१२ उमेदवार यांनी घेतली माघार
शेवगाव ( प्रतिनिधी) 5 नोव्हेंबर
शेवगाव पाथर्डी मतदार संघात १९४७२४ पुरुष मतदार व १७९६९४ महिला मतदार व इतर ६ असे एकूण ३७४६४२ मतदार असून,शेवगाव पाथर्डी मतदार संघातील दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची आज दि. 4 शेवट मुदत होती यामध्ये निवडणूक रिंगणातील उमेदवार मोनिका राजीव राजळे,प्रताप बबनराव ढाकणे,चंद्रशेखर मारुतराव घुले, हर्षदा विद्याधर काकडे ,किसन जगन्नाथ चव्हाण,आत्माराम किसन कुंडकर, सुभाष त्रिंबक साबळे, एकनाथ विष्णू सूसे,सुधाकर रामभाऊ चोथे, युनूस चांद शेख,रत्नाकर जनार्दन जावळे, राजेंद्र रंगनाथ ढाकणे, शिवहारी पुंजाराम काळे, सलमान युसुफ बेग, संदीप गोरक्षनाथ शेलार यांनी आपले उमेदवारी अर्ज ठेवले आहे.
यांनी घेतली माघार – किसन महादेव आव्हाड,गोकुळ विष्णू दौंड,चंद्रकांत भाऊसाहेब लबडे,निलेश प्रमोद बोरुडे,
यशवंत साहेबराव पाटेकर, पांडुरंग गोरक्ष शिरसाट, स्नेहल दत्तात्रय फुंदे,अंकुश भीमराव चितळे,विद्याधर जगन्नाथ काकडे, बाळू बाबुराव कोळसे, दिलीप कोंडीबा खेडकर, तुळशीराम नामदेव पडळकर यांनी आपले अर्ज शेवटच्या दिवशी माघार घेण्यात आले आहेत.
चौकट – देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात, निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे. राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार व अपक्ष उमेदवार यांचं सर्वसामान्य वर्तन कसं असावं याविषयी माहिती दिली आहे, तसंच प्रचारसभा, मिरवणुका, रॅली काढण्याविषयी नियम आणि अटी दिलेल्या आहेत. कुठल्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते. कोणीही आदर्श आचार साहिंतेचा भंग करू नये असे आव्हान निवडनुक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी केले आहे. नरहरी शहाणे अँक्टिव्ह मराठी न्यूज. शेवगाव, पाथर्डी







