Breaking
ब्रेकिंगसामाजिक

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राहुरीत भव्य शिबीराचे आयोजन..

0 1 4 7 2 7

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राहुरीत भव्य शिबीराचे आयोजन..

राहूरी. (प्रतिनिधी) १३जुलै. ‌ मुख्यमंत्री -माजी लाडकी बहीण या योजना अंतर्गत 21 वर्ष ते 65 वर्ष या वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांचे आवश्यक कागदपत्रावरून ऑनलाईन अर्ज भरणे तसेच विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज भरून घेणे कामी शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 व शनिवार दिनांक 13 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळात राहुरी येथे भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राहुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री- माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एकच वर्ष ते 65 वर्ष या वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांचे आवश्यक कागदपत्रावरून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी केशर मंगल कार्यालय, मल्हारवाडी रोड, योगा भवन, गोकुळ कॉलनी, अहिल्या भवन, स्टेशन रोड इत्यादी तीन ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदरचे दोन्ही दिवशी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांसह नमूद ठिकाणी उपस्थित राहावे. तसेच इतर दिवशी अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला ,कॉमन सर्विस सेंटर, किंवा सेतू केंद्र यांच्यामार्फत ऑनलाईन फॉर्म भरू शकता, असे आवाहन राहुरी नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.उत्तर विभागिय सपादक दत्ताजी जोगदड सह उपसंपादक प्रशांत जोशी राहुरी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे