
प्रशांत(नाना)सातव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सरकारी योजना कार्ड नोंदणी शिबीरला मोठा प्रतिसाद…

बारामती प्रतिनीधी:-दि.२७ डिसेंबर २०२४ माजी.सहाय्यक विक्रीकर आयुक्त व सचिव-कारभारी आण्णा चँरिटेबल फाउंडेशन, बारामती प्रशांत(नाना)सातव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सरकारी ओजना कार्ड व नोंदणी शिबीर A.k.Y. ग्रुप कसबा यांच्या वतिने कारभारी भवण कसबा.बारामती या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते. कसबा भागातील नागरीकांनी शिबीराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. समाजकारणाला वाहून घेतलेला आपला नाना कारभारी अण्णांचा वारसा पुढे चालविणार बारामतीचे वीस वर्षांहून अधिक काळ नगराध्यक्ष राहिलेल्या धोंडिबा आबा. सातव यांचा वारसा प्रशांत(नाना) सातव पुढे चालवित आहेत. आपल्या कार्यशैलीने बारामतीकरांच्या कायम स्मरणात असलेल्या कारभा-यांचा वारसा शिक्षण, क्रीडा, समाजकारणाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा नानांचा प्रयत्न आहे. त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी त्यांनी कारभारी अण्णा फाऊंडेशनची स्थापना केली.व तसेत डॉ.बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा आणि सघर्ष करा हा अनमोल संदेश दिला त्याच संदेशाची कास धरीत डॉ. बाबासाहेंब आंबेडकर आभ्यासिका प्रशांत(नाना) सातव यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरु केली आहे स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी ही आभ्यासिका सुरु करण्यात आली. विद्यार्थीं त्याचा आजही लाभ घेत आहेत.कोरोनाच्या काळात विविध लोकांना मोफत भाजीपाला, सॅनेटायझर तसेच
पीपीई किट प्रदान करण्यात आले.
तसेच रक्तदान शिबीरही घेण्यात आले. बारामतीमध्ये मुलांना दर्जेदार
इंग्रजी शाळेची सुविधा प्राप्त व्हावी या
साठी त्यांनी कारभारी अण्णा इंग्लिश
मिडीयमच्या शाळेची स्थापना केली.
मुलांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी उत्तम इंग्रजी लिहीता वाचता व बोलता यायला हवे या भावनेतून त्यांनी या शाळेची स्थापना केली. बारामतीकरांना दिलासा मिळावा, त्यांचे मुलभूत प्रश्न सुटावे या साठीही त्यांनी अनेकदा आवाज उठवला. अनेक विषयांवर आंदोलन केले, उपोषणांच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेकदा वाईटपण स्विकारला मात्र लोकहिताच्या प्रभावर
त्यांनी कधीच माघार घेतली नाही. विरोध करताना त्यांनी तात्विक विरोध केला. हे करताना वैयक्तिक संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घेतली. या पुढील काळातही कायमच लोकांच्या हितासाठी समाजकारण करत राहण्याचा त्यांचा ध्यास आहे.नानांचा वाढदिवस २९ डिसेंबर या दिवशी आहे त्यांचेच अवचित्य साधुन A.K.Y. ग्रुपच्या वतिने हा शिबीराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समाजिक कार्यकरनारा हा ग्रुप आहे नेहमीच हा ग्रुप समाज हिताचे कार्यक्रम आपल्या बारामतीकरांसाठी घेत असतो. म्हनुण A.K.Yग्रुपचे कैतुक सतत बारामतीकर करत असतात. योगेश डहाळे, सचिन माने,तांबोळी सर, जाधव सर, यांच्या मार्गदर्शनाखाली.
A.K.Y.मित्र परिवार भरत खरात, महेश खरात,राहुल सोनवणे, विनोद कुंभार, राजू सय्यद, धिरज जाधव, स्वप्निल हरिहर, साजन हरिहर, अक्षय शिंदे, नंदू शिंदे, अंकित थोरात, सचिन रणदिवे, सतोष नवले, यांनी हा शिबीर यशस्वी पारपाडण्यासाठी परिश्रम घेतले.पुणे जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज. बारामती







