Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

वसमत येथे आर्य वैश्य महिला मंडळातर्फे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न..

विभागीय संपादक अनिल कुमार मुगुटकर अँक्टिव्ह मराठी न्यूज. वसमत. हिंगोली

0 1 4 7 2 7

आर्य वैश्य महिला मंडळातर्फे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

वसमत.(प्रतिनिधी) .दिनांक 18 जानेवारी
येथील आर्य वैश्य समाज महिला मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही 16 जानेवारी रोजी शहरातील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला . यावेळी शहरातील दिड हजार महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली. उपस्थित सर्व महिला भगिनींना हळदीकुंकू, तिळगुळ व भेटवस्तु देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. महिलांसाठी बाहुबली चित्रपटातील देवसेना हि थीम ठेवण्यात आली होती. समाजामध्ये प्रेम व स्नेह भाव वृध्दींगत व्हावा यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते अशी माहिती हिंगोली जिल्हाध्यक्ष सौ.रुपाली दलाल यांनी यावेळी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. कार्यक्रमानंतर सर्व आर्य वैश्य समाज बांधव भगिनींना तिळगुळ वाटप करण्यात आले व शेवटी स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट,अनिल मुगुटकर, अँक्टिव्ह मराठी न्युज, वसमत,हिंगोली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे