वर्चस्व ग्रुप तर्फे ऊसतोड कामगार महिलांना साडी वाटप.

वर्चस्व ग्रुप तर्फे ऊसतोड कामगार महिलांना साडी वाटप
*
भिगवण प्रतिनिधी:: ४ जानेवारी,२०२४ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे अवचित्य साधून वर्चस्व ग्रुप भिगवन (कुताळ वस्ती) यांच्या वतीने ऊसतोड कामगार महिला यांना साडी वाटप व तसेच लहान मुलांना कपडे वाटप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुताळवस्ती (भिगवण) तालुका इंदापूर येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड. पोपटराव सूर्यवंशी साहेब, अजितदादा युथ फाउंडेशन बारामतीचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ आप्पा गायकवाड, इंदापूर तालुक्याचे युवा नेते पै. प्रशांत मामा उंबरे, डायमंड उद्योग समूहाचे संस्थापकध्यक्ष अमोल दादा गायकवाड, अजित दादा युथ फाउंडेशनचे सचिव सचिन शेठ घाडगे, हे उपस्थित होते. शिक्षिका रोहिणी सुरवंशी यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व आभार वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ कुताळ यांनी मानले. केतन भाऊ कुताळ मित्रपरिवार. संतोष निंबाळकर, गणेश कुताळ, अनिकेत नादगुडे, हरी साठे, श्रेयश राक्षे, विशाल कुताळ, राहुल कुताळ , यांनी हा कार्यक्रम पार पडण्यासाठी परिश्रम घेतले. पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.







