Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

अनुदान नको लिटरला ४० रुपयांचा भाव द्या:, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे ऍक्टिव्ह मराठी न्यूज बारामती पुणे

0 1 4 7 2 7

अनुदान नको लिटरला ४० रुपयांचा भाव द्या:, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

बारामती प्रतिनिधी: ७ डिसेंबर २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे बारामती येथे दुध आणि कांदा दरवाढीसाठी आयोजित आंदोलनात खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी आपला सहभाग दर्शवला व. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. महत्वाची खाती आणि मंत्री पदे वाटपात सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. बहुमताने सत्तेत आलेले सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन आहे. सरकारने दुधाला ४० रूपये लीटर दर द्यावा, अशी मागणी केली. सरकारकडून न्याय मिळत नसल्यामुळे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करुन हमी भाव द्यावा, अशी मागणी केली. देशातील शेतकऱ्यांना शेती परवडत नाही हा गंभीर विषय आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी करुन शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही दिली. लवकरच हमी भावासाठी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. हा देश शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा आहे. त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडली. याप्रसंगी युगेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.
पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे