भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीसाठी अमोल भोसले यांचे मार्गदर्शन.
पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोद शितोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज दौंड

भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीसाठी अमोल भोसले यांचे मार्गदर्शन.
जेजुरी दि.11 जानेवारी (प्रतिनिधी) प्रमोद शितोळे पश्चिम विभागीय सहसंचालक.: नागरिकांच्या सोयीसाठी व भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीसाठी जेजुरी पोलीस स्टेशन येथे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.अँटी करप्शन ब्युरो,पुणेचे पोलीस निरीक्षक श्री.अमोल भोसले यांनी या सत्रात उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये त्यांनी सरकारी कर्मचारी (लोकसेवक) किंवा लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.तक्रारी नोंदवण्यासाठी आवश्यक असलेल्या पद्धती,पुरावे संकलन आणि कायदेशीर प्रक्रिया यावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुरंदर तालुका अध्यक्ष प्रसाद अत्रे, संघटक निलेश भुजबळ, गिरीश झगडे, जयकुमार पाटील,सनी झगडे,किशोर खोमणे,किरण भुजबळ तसेच इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.
नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय भ्रष्टाचाराचा नायनाट होऊ शकत नाही, असे सांगत श्री. भोसले यांनी सर्वांना भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सांगतेस पोलीस निरीक्षक श्री. भोसले यांनी उपस्थित नागरिकांच्या शंकांचे समाधान केले व अँटी करप्शन ब्युरोच्या संपर्क साधनांबाबत माहिती दिली.
या उपक्रमामुळे जेजुरी परिसरातील नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरोधी जागरूकता वाढीस लागेल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.







