बारामती एमआयडीसी पेन्सिल चौकातील अतिक्रमणे ठरताहेत जीवघेणे.

बारामती एमआयडीसी पेन्सिल चौकातील अतिक्रमणे ठरताहेत जीवघेणे.
बारामती प्रतिनिधी दि.15/01/2025
बारामती शहरातील एमआयडीसी परिसरातील सुभद्रा मॉल समोरील अतिक्रमण नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सूचना देताच नगरपालिकेने काढून तातडीची कारवाई केली होती. त्यानंतर सदर सर्व्हिस रोड नागरीकांच्या वापरासाठी पुन्हा एकदा मोकळा झाला असताना काही मुजोर दुकानदार दादांच्या या आदेशाला व नगर पालिकेला न जुमानता मनमानी कारभार करून पुन्हा त्या ठिकाणी रस्त्यावर आपले स्टॉल लावत आहेत.अशा स्टॉल मुळे रस्त्यावर गाड्यांची गर्दी होऊन अनेक जीवघेणे अपघात यापूर्वी झालेले आहेत तसेच भविष्यात ही अपघात होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.
लवकरात लवकर पेन्सिल चौक येथील अतिक्रमण न हटवल्यास होणाऱ्या अपघाताला बा.न.पालिका प्रशासन,संबधित अधिकारी जबाबदार असतील तसेच अतिक्रमण कारवाई लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे.
बारामती प्रतिनिधी सुयश बगाडे







