Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बारामती नगर परिषदने संबंधितांना दिलेल्या नोटिसांवर कारवाई करण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोटीसानुसार कारवाई न केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर आपल्या कर्तव्यात कसूर केला असल्याने शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी… प्रशांत दादा सरतापे यांचे आमरण उपोषण.

पुणे जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती. पाटोळे ऍक्टिव्ह मराठी न्यूज

0 1 4 7 2 7

बारामती नगर परिषदने संबंधितांना दिलेल्या नोटिसांवर कारवाई करण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोटीसानुसार कारवाई न केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर आपल्या कर्तव्यात कसूर केला असल्याने शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी…

प्रशांत दादा सरतापे यांचे आमरण उपोषण.

बारामती प्रतिनिधी :- १७ जानेवारी २०२५ नगर परिषद बारामती यांचे कार्यालयासमोर दिनांक १४/०१/२०२५ रोजी प्रशांत दादा सरतापे आमरण उपोषण करीत आहेत. वारंवार तक्रारी अर्ज करून देखील कोणतेही कारवाई होत नसल्याने आमरण उपोषण करण्याची वेळ आली असल्याची त्यांनी आपले मत व्यक्त केले.
१) बारामती हद्दीतील सर्व्हे नं – ३२/ ब / १/ २ कै. अनंतराव पवार उद्योग भवन, शिवाजी चौक (जाधव कॉम्प्लेक्स) मधील बेकायदेशीर बांधकामाचे बारामती नगर परिषदे मार्फत तत्काळ अतिक्रमण काढावे.
व महाराष्ट्र प्रादेशीक व नगरचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३.नुसार कारवाई करावी.
२) बारामती नगर परिषदे कडून वारंवार नोटीसा देवून देखील अतिक्रमण काढत नसल्याने संबंधितांवर शासन नियमांचे पालन केले नाही म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करावा.
३) बारामती नगर परिषदेने संबंधितांना दिलेल्या नोटीसांवर कारवाई करण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यानी नोटीसा नुसार कारवाई न केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर आपल्या कर्तव्यात कसूर केला असल्याने शिस्तभंगाची कारवाई करावी. अन्यथा मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण चालूच राहील असे सांगण्यात आले.
जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे