शाळा तेथे आर एस पी युनिट.: शिक्षणाधिकारी कडूस वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण विभागाचे एक दिवसीय उद्बोधन शिबिर.
नगर तालुका प्रतिनिधी राहुल जाधव ॲक्टिव्ह मराठी न्यूज. नगर अहिल्यानगर

शाळा तेथे आर एस पी युनिट.: शिक्षणाधिकारी कडूस
वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण विभागाचे एक दिवसीय उद्बोधन शिबिर

(ॲक्टिव्ह मराठी) नगर तालुका प्रतिनिधी राहुल जाधव..दिनांक पाच फेब्रुवारी 2024 रोजी अहिल्यानगर येथे रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी संपन्न झाले त्याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री कडूस साहेब यांनी आरएसपी विभागाचे महत्त्व विशद करताना सांगितले की प्रत्येक शाळेमध्ये आरएसपी युनिट अत्यावश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियम व नियमांचे महत्त्व रुजविले जाईल
वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण विभागाच्या वतीने रेसिडेन्शियल विद्यालयाच्या मध्ये माननीय लेखाधिकारी व आर एस पी विभागाचे मार्गदर्शक श्री मनोज शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय सहविचार सभा पार पडली याप्रसंगी अहिल्यानगर विभागाच्या आरटीओ अधिकारी प्रियंका उनवणे व लेखा अधिकारी मनोज शिंदे शहर वाहतूक विभागाचे प्रमुख श्री बाबासाहेब बोरसे साहेब रेसिडेन्शिअल विद्यालयाचे प्राचार्य व आर एस पी विभागाचे कार्याध्यक्ष श्री विजय पोकळे हे उपस्थित होते
याप्रसंगी रस्ते अपघात व नैसर्गिक आपत्ती वाहतूक कोंडी यासंदर्भात आर एस पी विभागाची कसे महत्वपूर्ण योगदान आहे याविषयी राज्य समादेशक श्री सिकंदर शेख यांनी माहिती सांगितली
जिल्हा समादेशक श्री सोमनाथ बोंताले सर यांनी अभ्यासक्रमामध्ये असणारे आरएसपी विभागाचे महत्त्व त्याचबरोबर निरनिराळ्या उत्सव प्रसंगी आरएसपी विभाग वाहतूक शाखेचा कशाप्रकारे मदत करतो याविषयी आर एस विभागाचे योगदान याविषयीची माहिती सांगितली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयएस विभागाचे उपसमादेशक श्री प्रकाश मिंड सर व अतिरिक्त समादेशक श्री चंद्रकांत डोफे सर यांनी प्रयत्न केले
त्यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या
आर एस पी विभागाच्या कार्याध्यक्षपदी रेसिडेन्शिअल विद्यालयाचे प्राचार्य श्री विजयकुमार पोकळे उपसमादेषक पदी श्री प्रकाश मिंड अतिरिक्त समादेशक पदी श्री डोफे राहुरी तालुका समादेशक पदी श्री राहुल जाधव श्रीरामपूर तालुका समादेशक पदी श्री संदीप तारडे सर नगर शहर समादेशक पदी श्री एकनाथजी लगड नगर तालुका समादेशक पदी श्री राजेंद्र धस जिल्हा कोषाध्यक्षपदी विनायक साळवे राहता तालुका समादेशक पदी श्रीउर्हे सर अकोले तालुका समादेशक पद श्री घुले दत्तात्रेय व संगमनेर तालुका समादेशक पदी विकास सोनवणे यांच्या नियुक्ती करण्यात आल्या
चौकट
जर(जर आपण मोबाईल घेतला तर त्याला स्क्रीन गार्ड बसवतो वस्तूंची इतकी काळजी घेतो वस्तूंना जपतो तर मौल्यवान अशा आपल्या अवयवांची काळजी घेतली पाहिजे डोक्यावर हेल्मेट वापरले पाहिजे त्याचबरोबर भविष्यामध्ये दुजाकी वाहन हेल्मेट घातल्याशिवाय चालूच होऊ नये अशा प्रकारचे तंत्रज्ञान यायला हवे असे प्रतिपादन आरटीओ प्रियंका उनवणे यांनी केले)
आर एस पी विभाग सर्व शाळांमध्ये राबवण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये एक आरएसपी अधिकारी असणे गरजेचे आहे सर्वांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून मे महिन्यामध्ये अहिल्यानगर मध्ये प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे आपली नाव नोंदणी करून विभागाचे प्रशिक्षण घेण्याची संधी चा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समादेशक श्री सोमनाथ बोंतले यांनी केले. ऍक्टिव्ह मराठी न्यूज .अहिल्यानगर







