Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

बौद्धीक संपदा अधिकारावर (आयपीआर)व्याख्यान संपन्न….

विभागीय संपादक अनिल कुमार मुगुटकर अँक्टिव्ह मराठी न्यूज.वसमत.हिंगोली.

0 1 4 7 2 7

बौद्धीक संपदा अधिकारावर (आयपीआर)व्याख्यान संपन्न….

वसमत..प्रतिनिधी.. दिनांक 8 फेब्रुवारी..

येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात दिनांक ८ फेब्रुवारी रोजी विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक संपदा अधिकारावर व्याख्यान संपन्न झाले.
देशाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक क्षमतांचा वापर करून संशोधन करून नाविन्यपूर्ण संकल्पना मांडाव्यात व या संकल्पनावर आधारित पेटंट, काॅपीराइट व ट्रेडमार्क चे अधिकार व हक्क अबाधित राखण्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन प्राचार्य डॉ मा मा जाधव यांनी केले.
बौद्धिक संपदा अधिकारावर (आयपीआर) साधन व्यक्ती म्हणून प्रा डॉ अनिल मुगुटकर यांनी पाॅवर पाॅइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पेटंट, काॅपीराइट व ट्रेडमार्क नोंदणी, कायदे, भविष्यातील फायदे अनेक उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळी उपप्राचार्य डॉ महेश स्वामी यांनी कार्यक्रमाचा उद्देश आपल्या मनोगतातुन विद्यार्थ्यांना सांगितला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अनिल कल्याणकर यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर विभागातील शंभर पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. तसेच यावेळी
विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा दुगाने मॅडम यांनी केले.
ब्युरो रिपोर्ट,अनिल मुगुटकर, एक्टिव मराठी न्युज, वसमत, हिंगोली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे