Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

श्रीनिवास बोज्जा यांना राज्यस्तरीय अध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार राष्ट्रीय लोकराज्य न्युजचे वतीने जाहीर.

शहर प्रतिनिधी सागर संबबन अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

श्रीनिवास बोज्जा यांना राज्यस्तरीय अध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार राष्ट्रीय लोकराज्य न्युजचे वतीने जाहीर.

अहिल्यानगर (ॲक्टिव्ह मराठी) शहर प्रतिनिधी .सागर सब्बन.
नगर: राष्ट्रीय लोकराज्य न्युज मीडिया समूह, महाराष्ट्र राज्य च्या वतीने सन 2025 चा देण्यात येणारा ‘आध्यत्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार’ सहजयोग चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांना जाहीर झाला आहे.
समाजाच्या विविध घटकात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. सन 2025 चा आध्यत्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार श्रीनिवास बोज्जा यांना जाहीर केल्याची माहिती राष्ट्रीय लोकराज्य न्युज चे मुख्य संपादक राहुल कुदनर यांनी दिली.

श्रीनिवास बोज्जा यांनी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक व आध्यत्मिक कार्यात अग्रेसर काम केले आहे व करीत आहे. अध्यात्मिक गुरु प. पु. माताजी श्री निर्मलादेवी यांच्या कृपा आशीर्वादाने सहजयोग या अध्यात्मिक परिवारात काम करत असून अहमदनगर जिल्ह्याचे समन्वयक म्हणूनही काम केले असून अहमदनगर येथे सहजयोग चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून या संस्थेचे वतीने गोविंदपुरा भागात सहज भुवन निर्माण केले व त्या ठिकाणी ध्यान साधनेचे वर्ग विनामूल्य घेतले जात असून अनेक सामाजिक कार्य ही केले जाते. तसेच विश्व निर्मल फौंडेशन शैक्षणिक संस्थेचे वतीने बोल्हेगाव भागातील गरीब विदयार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळा सुरु करून अत्यंत कमी फी मध्ये सर्व सुविधा विदयार्थ्यांना प्राप्त करून दिले असून विशेष म्हणजे शैक्षणिक शिक्षणा बरोबर अध्यात्मिक शिक्षण ही मुलांना दिले जाते.

श्रीनिवास बोज्जा यांनी सहजयोगाचे कार्य अहिल्या नगर जिल्ह्यास महाराष्ट्रात तसेच भारता बाहेर नेपाळ, सिंगापूर व युरोप देशातील ऑस्ट्रिया, कबेला, रोम या देशातही सहजयोगकार्यासाठी त्या ठिकाणी होणाऱ्या पूजेचा लाभ घेतला आहे. श्रीनिवास बोज्जा यांना या पूर्वीही दिल्ली सरकारचा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार दिल्ली येथे देण्यात आला. शब्दगंध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य चे वतीने राज्यस्तरीय शब्दगंध समाज कार्य गौरव पुरस्कार देण्यात आले तर लोकसत्ता संघर्ष च्या वतीने समाजरत्न पुरस्कार जाहीर झाले.

श्रीनिवास बोज्जा यांचे अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य ची माहिती घेऊन त्यांची राज्यस्तरीय.् आध्यत्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून हा राज्यस्तरीय पुरस्कार 6 एप्रिल 2025 रोजी एस फोर जी हॉटेल, थेवूर फाटा, पुणे येथे दिले जाणार आहे.

श्रीनिवास बोज्जा यांना राज्यस्तरीय आध्यत्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर. .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे