Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

प्राध्यापकांच्या विविध प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक*

ब्युरो रिपोर्ट प्रतिनिधी अनिल कुमार मुगुटकर अँक्टिव्ह मराठी न्यूज. वसमत हिंगोली

0 1 4 7 2 7

प्राध्यापकांच्या विविध प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक*

वसमत. (ॲक्टिव्ह मराठी) दि.२८/०३/२०२५ प्रतिनिधी
दिनांक २४मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचे समवेत मंत्रालय मुंबई येथे प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये विविध विषयांचा परामर्श घेण्यात आला व त्यासंबंधी निर्णय घेण्याचे आश्वासन माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी केले. यामध्ये चाल४/४/२०००- ते १८/ १०/२००१ या कालावधीत बिगर नेट सेट झालेल्या परंतु निवड समितीमार्फत निवड झालेल्या प्राध्यापकांना निवृत्ती वेतन लागू करणे. त्याचप्रमाणे 8/3/2019 पर्यंत पीएचडी झालेल्या सर्व प्राध्यापकांना तीन वेतन वाढी मंजूर करणे. सहाव्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी ते 30 जून या दरम्यान नियुक्त झालेल्या प्राध्यापकांच्या वेतन कपातीबाबत निर्णय घेऊन ती वेतन कपात रद्द करणे आणि एक वेतन वाढ पुन्हा लागू करणे. नांदेड अमरावती व कोल्हापूर विभागातील ऑफलाइन वेतन प्रणाली रद्द करून ऑनलाइन वेतन प्रणाली चालू करणे .वरिष्ठ महाविद्यालयातील सीएचबी वर नियुक्त झालेल्या प्राध्यापकांना दरमहा ६००००वेतन लागू करणे . महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या प्रलंबित असलेल्या पदोन्नती त्वरित लागू करणे . सहाव्या वेतन आयोगातील एम फील झालेल्या प्राध्यापकांना पदोन्नती लागू करणे . प्राध्यापकांचे निवृत्ती वय ६५ करणे आणि ७ व्या वेतन आयोगानुसार पे मॅट्रिक्स मध्ये सुधारणा करणे.
वरील सर्व अनुषंगिक विषयासंदर्भात माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी उपस्थित सर्व प्रतिनिधींशी चर्चा केली आणि त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी आमदार विक्रम काळे,आमदार मनीषा कायंदे, तसेच माननीय प्रधान सचिव रेड्डी, उच्च शिक्षण संचालक, माननीय तंत्र शिक्षण संचालक , तसेच *मस्ट* संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार , सचिव डॉ. निर्मला पवार , डॉ. मनीष पांडे , कोल्हापूर येथील *मस्ट* संघटनेचे प्रतिनिधी प्रा. एल एन गायकवाड , नांदेड येथील मस्ट संघटनेचे प्रतिनिधी डॉ. गणपत कारिकंटे उपस्थित होते . *मस्ट* संघटनेच्या सल्लागार व विधानपरिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत मस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ . विजय पवार यांनी प्राध्यापकांचे विविध प्रश्न मांडले.
ब्युरो रिपोर्ट, अनिल मुगुटकर, अँक्टिव्ह मराठी न्युज,वसमत, हिंगोली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे