वसमत शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोर सक्रिय.
ब्युरो रिपोर्ट अनिल कुमार मुगुटकर सह विभागीय संपादक ज्ञानेश्वर कोसलगे. अँक्टिव्ह मराठी न्यूज वसमत हिंगोली ज्ञानेश्वर कोसलगे

वसमत शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोर सक्रिय.
वसमत. (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी.वसमत येथे आज दिनांक 30/03/2025 रविवारला सौ.पुष्पाताई अवचार रा.तांभाळे हाॅस्पीटल च्या बाजूस, बालाजीनगर, वसमत आपल्या घरासमोर झाडत असतांना सकाळी 7 वा.सुमारास मोटरसायकल वर आलेल्या अज्ञात तिन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन ओढली. सौ.अवचार ताईनी त्या चोरांचा प्रतिकार केला व आरडा ओरड केली. त्यांच्या आवाजाने आजु बाजुस असलेले नागरीक धावत येत असल्याची चाहुल लागताच ते अज्ञात तिघे चोर मोटरसायकल वर पसार होण्यात यशस्वी झाले.
भर सकाळी वर्दळिच्या ठिकाणी असा प्रकार घडल्यामुळे महिलां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सोनसाखळी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यापूर्वीही शहरात अशा घटना घडलेल्या आहेत. बर्याच अवधी नंतर चोरट्यांनी पुन्हा एकदा संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे.
भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ब्युरो रिपोर्ट, अनिल मुगुटकर, विभागीय संपादक ज्ञानेश्वर कोसलगे.अँक्टिव्ह मराठी न्युज, वसमत हिंगोली.







