नववर्षाच्या स्वागतासाठी ज्ञानदीप ग्रंथालयने उभारली ‘पुस्तकांची गुढी’
यवत शहर प्रतिनिधी राहुल कुमार अवचट अँक्टिव्ह मराठी न्यूज. यवत

नववर्षाच्या स्वागतासाठी ज्ञानदीप ग्रंथालयने उभारली ‘पुस्तकांची गुढी’
यवत (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी
राहुल कुमार अवचट. दि.३१ मार्च.
मराठी भाषेला काही महिन्यांपूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याच उत्साहात दरवर्षी प्रमाणे यंदाही ज्ञानदीप ग्रंथालयचे हर्षद बंदीष्टी यांच्या संकल्पनेतून पुस्तकांची गुढी उभारून आनंदमय वातावरणात यंदाचा गुढी पाडवा साजरा करण्यात आला.
आज राज्यभरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून मराठी बांधव एकमेकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतात. घरासमोर उभारलेल्या गुढी परिसराची शोभा वाढवत असतात. दौंड तालुक्यातील पाटस येथील ज्ञानदीप ग्रंथालय यांच्या वतीने गुढी पाडवा पारंपरिक गुढी उभी करण्याबरोबरच एक वेगळा विचार डोळ्यासमोर ठेवत पुस्तकांची गुढी उभारून एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे त्यांच्या या विचाराचे तालुक्यात सगळीकडे कौतुक होत आहे.
घरासमोर गुढी उभारुन सर्वजण आपली संस्कृती-परंपरा जपतात.त्यासोबतच पुस्तकांची गुढी उभारुन आपली अभिजात मराठी भाषा मनामनात रुजली पाहिजे तसेच भावी पिढीत वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी हा या “पुस्तकांची गुढी” संकल्पनेमागचा हेतू आहे. ज्ञानदिप ग्रंथालय कडून नेहमीच वाचन कार्याला प्रोत्साहन मिळत असते. गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच यांसह इतर शैक्षणिक साहित्य वाटप करणे, शिक्षण संस्थांच्या ग्रंथालयांना स्पर्धा परीक्षा संदर्भातील पुस्तके उपलब्ध करून देणे तसेच ऐन उन्हाळ्यात वन्य प्राण्यांसाठी वन परिसरातील कृत्रिम पाणवठ्यात पाणी सोडणे अशी उपयुक्त अभियाने संस्थेकडून राबविली जातात दरम्यान आज नव वर्षाच्या स्वागतासाठी पुस्तकांची गुढी उभारण्यामागे पुस्तके वाचणे ही काळाची गरज असल्याचा एक सामाजीक संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून ज्ञानदीप ग्रंथालय कडून देण्यात आला आहे.
याप्रसंगी ज्ञानदीप ग्रंथालयचे विश्वस्त हर्षद बंदीष्टी, प्रमोद ढमाले,विठ्ठल वाळुंजकर तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक नागरगोजे,गणेश सूळ आदि सदस्य उपस्थित होते. अक्टिव्ह मराठी न्यूज. यवत.







