Breaking
ब्रेकिंग

वसमत शहरातील नागरिकांना सुरळीत वाहतुकीसाठी वसमत पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन.

0 1 4 7 2 7

वसमत शहरातील नागरिकांना सुरळीत वाहतुकीसाठी वसमत पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन.
वसमत (प्रतिनिधी) १६ ऑगस्ट वसमत शहरातील बाजार पेठेतील सर्व व्यापारी बांधवाना आवाहन करण्यात येते की सध्या श्री गणेशाचे आगमन व विविध सण, उत्सवाचे आगमन होत असल्याने बाजारपेठेत वाहनांची गर्दी होऊन वयोवृध्द ,महीला, बालकां सह सर्व नागरिकांना त्रास होत असल्यामुळे वाहतुक नियंत्रन ,वाहन तळ निश्चित करणे आवश्यक आहे. शहरातील वाढत्या गर्दी मूळे पोलीस प्रशासनाने वरिल निर्णय घेतला आहे.
बाजार पेठेतील व्यापारी बांधवानी रोड वर जाहीरातीच्या पाटया व इतर साहित्य ठेऊ नये, रोडवरील रहदारी मुळे ट्राफीक जॅम होऊ नये या करिता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे . वाहनचालक नागरीकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे . पोलीस प्रशासनाने घालुन दिलेल्या सुचनाचे पालन न केल्यास त्यांच्या वर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सदरील नियम 26 ऑगस्ट 2024 सोमवार पासुन अमलात येतील,सम विषम पार्किंगचे नियम लागू होतील असे शहर पोलीस प्रशासनाचे वतीने कळवीण्यात येत आहे. सर्व व्यापारी व नागरीकांनी नोंद घेऊण जनहितार्थ प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. विभागीय उपसंपादक अनिल कुमार मुकुटकर ॲक्टिव्ह मराठी न्यूज. वसमत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे