जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी*…

प्रादेशिक हवामान केंद्रने जिल्ह्यात नऊ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे नर्गमित केले आहेत अतिवृष्टीमुळे कोणतेही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आप्तकालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील बारावी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी राहील तथापि या कालावधीत सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थितीत राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांनी सावधानता बाळगावी धबधबे च्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये आवश्यक्य असेल तरच बाहेर पडावे असे आव्हाने जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे तालुका प्रतिनिधी किरण बोराडे अँक्टिव्ह मराठी न्यूज.बारामती.







