Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बारामतीत महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

पुणे जिल्हा प्रतिनिधी विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज बारामती. पुणे

0 1 4 7 2 7

बारामतीत महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
बारामती प्रतिनिधी: १३ एप्रिल २०२५ सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ व्या जयंतीनिमित्त डीजेविरहित पारंपारिक पद्धतीने काढण्यात आलेली मिरवणूक हे या जयंती उत्सवाचे खास आकर्षक ठरले. सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती बारामती शहर व ग्रामीण यांच्यावतीने या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी ९ वाजता. महात्मा फुले चौक खंडोबा नगर येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व दुपारी ४ वाजता पाटस रोड येथील महात्मा ज्योतिबा फुले वस्तीगृह येथून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पेहराव्यातील २०० महिला मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यामध्ये उंट,ढोल पथक, लेझीम पथक, तुतारी पथक, हलगी पथक, सावता माळी दिंडी तसेच बैलगाड्यांचा समावेश होता. महात्मा फुले यांची ११ फुट उंचीची मूर्ती विराजमान होती. हा जयंती सोहळा बारामती शहराच्या दिशेने काढण्यात आला होता. पाटस रोड वरून महात्मा फुले चौक खंडोबा नगर. कारभारी सर्कल कसबा साठेनगर चौक, गुणवडी चौक, गांधी चौक, सुभाष चौक, भिगवन चौकातून शारदा प्रांगण येथे मिरवणुकीची सांगता झाली. यामध्ये सर्व जाती-धर्मातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सोहळ्यामध्ये महात्मा फुले यांच्या कार्याचा जागर करण्यात आला होता.
पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे