Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंग

0 1 4 7 2 7

महिलेवर बलात्कार करुन दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग. करणाऱ्या भोंदू मांत्रिकाला अटक*

*अहिल्यानगर प्रतिनिधी संगीता खिलारी*

मुंबई पोलिसांची कारवाईआजारातून बरं करतो असं सांगत महिलेवर बलात्कार आणि दोन मुलींचा विनयभंग, पोलिसांनी केली मांत्रिकाला अटक*४३ वर्षांच्या एका मांत्रिकाला मुंबई पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपांखाली अटक केली आहे. मुंबईतल्या गोरेगाव भागात एका ३७ वर्षीय महिलेवर या मांत्रिकाने बलात्कार केला. या प्रकरणात या मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला या मांत्रिकाने तुझ्या नवऱ्याला आजारातून बरं करतो वगैरे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर नवऱ्याला आजारातून बरं करण्याच्या बहाण्याने या महिलेवर तीनवेळा बलात्कार केला. तू या गोष्टीची वाच्यता केलीस तर तुझ्या नवऱ्याला काळी जादू करुन मारुन टाकेन असंही या मांत्रिकाने धमकावलं होतं. आता पोलिसांनी या मांत्रिकाला अटक केली आहे. ॲक्टिव्ह मराठी न्यूज.

पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजाराम यादव नावाच्या मांत्रिकाने एका ३७ वर्षांच्या महिलेवर तीनपेक्षा जास्त वेळा बलात्कार केला. तसंच तिच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंगही केला. या महिलेच्या पतीची प्रकृती जुलै २०२० पासून बिघडली आहे. त्याला बरं करतो, ठणठणीत करतो असं भासवून या राजाराम यादव नावाच्या आरोपीने महिलेवर बलात्कार केला. ॲक्टिव्ह मराठी न्यूज.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे