पीक विमा संबंधी जाचक अटी रद्द करा मा. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना दिले निवेदन.
प्रतिनिधी नरहरी शहाणे अँक्टिव्ह मराठी न्यूज.

पीक विमा संबंधी जाचक अटी रद्द करा मा. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना दिले निवेदन.
अहिल्यानगर (ॲक्टिव्ह मराठी ) प्रतिनिधी नरहरी शहाणे : दिनांक 8 एप्रिल प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात सन २०१६ पासून राबविण्यात येत असून सन 2023 व 24 पासून एक रुपयात पिक विमा ही सर्वसामावेशक पिक विमा योजना राबविण्यात येत आहे सदर योजनेचे चालू वर्ष हे दुसरे वर्ष असून सदर योजनेत केंद्र शासनाने पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादन ही विमा संरक्षणाची बाब अनिवार्य केली आहे . मात्र या व्यतिरिक्त चार बाबी राज्य शासनाने ऍड ऑन कव्हर म्हणून स्वीकारले आहेत त्यात प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेले नुकसान, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, या बाबींचा अंतर्भाव आहे परंतु 20 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिक विमा योजनेमध्ये सध्या असलेली चार ॲडऑन कव्हर काढून केवळ पीक कापणी प्रयोग आधारित विमा योजना खरीप 2025 हंगामापासून राबवावी असे निर्देश त्यांनी या वेळी दिले आहे .हे निकश तसेच या अटी शासनाने रद्द कराव्यात या अटी शेतकरी हिताच्या नसून सरकार हिताच्या आहेत या संदर्भात रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना या संदर्भात ज्याचक अटी शेतकरी हिताच्या नसून त्या रद्द कराव्यात असे निवेदन देण्यात आले याप्रसंगी सतीश पवार भिकाभाऊ रेवाळे सुनील पवार पांडुरंग देठे माऊली निशाणे आकाश निशाने राहुल निशाने प्रसाद जाधव योगेश पवार प्रसाद पवार वैभव तूवर तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . तसेच या संदर्भात मा. जिल्हा कृषी उप संचालक सागर गायकवाड जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांना ही या संदर्भात निवेदन देण्यात आले . अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर.







