पिंपळगाव ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधी वाटप
पुणे जिल्हा (अँक्टिव्ह मराठी ) प्रतिनिधी प्रमोद शितोळे, मो,9096984142 .दौंड .

पिंपळगाव ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधी वाटप.

पुणे जिल्हा (अँक्टिव्ह मराठी ) प्रतिनिधी प्रमोद शितोळे, मो,9096984142 .दौंड .तालुका पिंपळगाव ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधी वाटप करण्यात आला सरपंच सौ कविता दिगंबर कापरे उपसरपंच शितल विनोद मापारे ग्रामविकास अधिकारी अशोक लोणकर साहेब यांच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना दिली वाटप करण्यात आला, कार्यक्रमाचे मार्गदर्शक दिवंगत ज्येष्ठ प्रमुख पुणे श्री जालिंदर भाऊ दिवेकर यांनी दिव्यांग लाभार्थ्यांना सरकारी योजनेची माहिती दिली व बँकेमधील बचत खाते उघडण्याबाबत या संदर्भात माहिती दिली, व दौंड तालुका अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रमोद शितोळे यांनी आपल्या भाषणावेळी म्हणाले की संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना व दिव्यांग बांधवांच्या साठी घरकुल योजनेची व पंचायत समिती व जिल्हा परिषद च्या माध्यमातून शासकीय कामकाजाबाबत घरकुल लाभार्थ्यांना आपल्या योजनेचा लाभ चांगल्या प्रकारे शासनाच्या माध्यमातून घेतला पाहिजे व दिव्यांग बांधवांसाठी लागणारे कागदपत्रे याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी श्री अशोक लोणकर यांनी दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाच टक्के निधी वाटपाची सविस्तर माहिती, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदि यांनी केले व कार्यक्रमाचे दिव्यांग लाभार्थ्यांचे आभार सरपंच उपसरपंच यांनी मानले, कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित श्री अजित मापारी श्री प्रकाश रायकर श्री श्रीपती शिंदे कुंडलिक शिंदे बाबा काळे संजीवनी जावळे आश्विनी विलास जावळे कृष्णा जावळे रामदास शिंदे सार्थक जाधव दौंड तालुका अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामपंचायत प्रमोद शितोळे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री जालिंदर दिवेकर व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते अँक्टिव्ह मराठी न्यूज.







