Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

मालेगाव चौकात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला उडवले ; अपघातात दोघांचा मृत्यू…मालेगावच्या नांदेड पॉईंटवर घडला ट्रक दुचाकीचा भीषण अपघात..

जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे अँक्टिव्ह मराठी न्यूज हिंगोली. नांदेड

0 1 4 7 2 7

मालेगाव चौकात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला उडवले ; अपघातात दोघांचा मृत्यू…मालेगावच्या नांदेड पॉईंटवर घडला ट्रक दुचाकीचा भीषण अपघात..

हिंगोली(ॲक्टिव्ह मराठी )..विभागीय जिल्हा प्रतिनिधी – रवि कुंटे दि.१९ एप्रिल  नांदेड जिल्ह्याच्या अर्धापुर तालुक्यातील मालेगाव मध्ये नांदेड अँटो पॉईंट जवळ थरारक दुचाकीचा भिषण अपघात अपघातात दोघांचा मृत्यु. सविस्तर माहीती अशी की, अर्धापुर वसमत रोडवर मालेगाव येथिल जिजाऊ माँ साहेब चौकात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकी वरील दोघेजण जागीच ठार झाले. व एक पदचारी गंभीर जखमी झाला, हि सदरील घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर ट्रक चालक जागेवरून पसार झाला.

मालेगाव येथुन जवळच असलेल्या कासारखेडा येथील पंकज माधव हिंगोले वय वर्ष विस व सुजल नागोराव धुतराज हली मुक्काम कासरखेडा वय वर्ष अठरा हे तरूण मुळ गाव सोनखेड हे आपल्या दुचाकीने आपल्या घराकडे जात होते,
अर्धापुर वसमत रोडवर 18 एप्रील रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वसमत मार्गे जाणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक GJ 01 KT- 9240 ची दुचाकी क्रमांक MH 26 BY 2672 जोराची धडक बसली.तर या थरारक भिषण अपघातात पंकज हिंगोले व सुजल धुतराज या दोघांचा घटनास्थळी जागेवरच मृत्यु झाला.तर घटनास्थळीच असलेला एक पदाचारी प्रमील प्रभाजी इंगोले वय वर्ष अठरा राहणार कासरखेडा हा या अपघातात गंभीर जखमी झाला असुन त्यास नांदेड येथे रुग्णालयात पाठवण्यात आल आहे.या घडलेल्या घटनेची सदर माहीती मिळताच म हा मार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करुन प्रेत मालेगाव आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. या वेळी घटनास्थळी महामार्ग पोलीस आदित्य लाकुळे, हनुमंत बोईनवाड, महेश तळेकर, अनिल मोपडे, जहीरुदिन फारूकी, संदिप चटलेवार, सुनिल पवळे, वसंत शिनगारे, यांनी मदत कार्य करत महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली. ॲक्टिव्ह मराठी न्युज. विभागीय प्रतिनीधी रवि कुंटे, ब्युरो रिपोर्ट मालेगाव, नांदेड.

5/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे