समाज कल्याण विभागचा निधी इतरत्र ओळवण्यात येऊ नये- नानासाहेब घोडके.
माजलगाव (ॲक्टिव्ह मराठी) जिल्हा प्रतिनिधी-विभागीय उपसंपादक किसन पवार अँक्टिव्ह मराठी न्यूज नेटवर्क


समाज कल्याण विभागचा निधी इतरत्र ओळवण्यात येऊ नये- नानासाहेब घोडके.
माजलगाव (ॲक्टिव्ह मराठी) जिल्हा प्रतिनिधी-विभागीय उपसंपादक किसन पवार दि.14.05.2025 राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड व डॉ. शांताराम कंराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघ बीड च्या वतीने दि. १४/५/२०२५ रोजी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दादा अजित पवार, समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांना उपजिल्हाधिकारी माजलगाव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले की, समाज कल्याण विभागाचा निधी हा मागासवर्गीय समाजाच्या विविध योजना राबविण्यासाठी व त्या मागे मागासवर्गीय समाजांचा सर्वांगीण विकासासाठी राखीव ठेवलेला असतो व तो देखील पुर्णपणे नसतो, या वर्षातील बराचसा निधी गेल्या महिन्यापासून इतर योजनांसाठी इतर विभागाकडे वळवण्यात आला आहे हे आम्हस वृत्तपत्र, टीव्ही व समाज कल्याण मंत्री यांच्या प्रसारमाध्यमांतील वक्तव्यावरून निदर्शनास आले आहे, त्यामुळे समाज कल्याण खात्या अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. तसेच समाज कल्याण मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनावर त्याचा पुरोगामी परीणाम होणार आहे. समाज कल्याण खात्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती, परदेशी शिकणाऱ्या मुलांची बार्टीच्या मार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती, आश्रम शाळा निधी, विद्यार्थी प्रशिक्षण निधी, तसेच मागासवर्गीयांच्या विविध कर्ज योजना इत्यादींवर व मागासवर्गीय समाजावर अन्याय होणार आहे. तसेच संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ यांच्याकडून मंजूर कर्ज प्रकरणे सहभाग भरलेले कर्ज प्रकरणाचे तात्काळ वाटप करण्यात यावे.सन २०२३-२४ मधील कर्ज प्रकरणांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी. तसेच बार्टी व आर्टी च्या धर्तीवर संत रोहिदास संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात यावी त्याच प्रमाणे संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाचे पुर्ण कर्ज माफ करण्यात यावे. तरी मागासवर्गीय समाजावर होणारा अन्याय दुर करुन निधीचे वितरण पूर्ववत समाज कल्याण विभागाला करण्यात यावे अशा प्रकारे समाजकल्याण खात्याचा निधी इतर खात्यात वळविण्याच्या घटना पुढे होऊ देऊ नयेत निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात हि विनंती हे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देताना युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव, जिल्हा सचिव ॲड. दत्ता जाधव, माजी कार्याध्यक्ष सत्यनारायण उनवणे, जिल्हा संघटक राधाकिसन भाळशंकर, माजलगाव तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे, उद्योजक सेल तालुकाध्यक्ष मोहन त्रिमुखे, उपाध्यक्ष अर्जुन पोहेकर, सल्लागार बंडु सोनवणे, भगवान सोनवणे साहेब, पी. के. ग्रुप पद्माकर कांबळे, ज्ञानेश्वर ठोंबरे सर, सचिन वाघमारे सर, अरविंद खंडागळे, शाहादेव, संतोष खंडागळे, वसंत वाघमारे, दीपक घोगरे, विलास गवळी, सौरभ ससाने निवेदन देण्यात आले. अँक्टिव्ह मराठी न्यूज. माजलगाव. बीड.







