Breaking
ब्रेकिंगसामाजिक

शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची 389 वी जयंती कुरुंदा नगरीत हर्ष उल्हासात साजरी. कुरुंदा येथील नाभिक समाज बांधवांकडून विविध उपक्रम राबवून थाटामाटात काढली भव्य मिरवणूक

0 1 4 7 2 7

शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची 389 वी जयंती कुरुंदा नगरीत हर्ष उल्हासात साजरी.

कुरुंदा येथील नाभिक समाज बांधवांकडून विविध उपक्रम राबवून थाटामाटात काढली भव्य मिरवणूक

हिंगोली (प्रतिनिधी)हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे आज दिनांक 16 ऑक्टोबर 2024 बुधवार रोजी असंख्य सर्व नाभिक महामंडळ कुरुंदा समाज बांधवांच्या वतीने शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची भव्य मिरवणूक कुरुंदा गावातील मुख्य मार्गाने काढण्यात आली.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा कुरुंदा यांच्या वतीने हर गाव, हर घर जयंती असे उपक्रम राबवत जयंती साजरी करण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांची 389 वी जयंती उत्सव हा 9 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रमुख वक्त्यांनी दिली.
तसेच यावेळी 14 ऑक्टोबर रोजी सह्याद्री देवराई टोकाई माता गड, कुरुंदा गडावर वृक्षारोपण व स्वच्छता अभियान या नाभिक समाज बांधवांकडून राबविण्यात आले, आज साजरी करण्यात आलेल्या शिवरत्न वीर जिवाजी महाले यांच्या जयंती निमित्त अनेक आजूबाजू च्या गावातील समाज बांधव व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी प्रथमता राजू नवघरे यांनी शिवरत्न वीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं, तसेच यावेळी गावातील व बाहेर गावातून आलेल्या मान्यवरांनी देखील प्रतिमेस पुष्प फुल वाहून मनोभावी अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आत्माराम कंठाळे सर, सूत्रसंचालन जय लोखंडे यांनी केले, प्रमुख प्रबोधनकार व्याख्याते माननीय गजानन इंगोले सर, तर या वेळी प्रमुख उपस्थिती अशोकराव दळवी, मुंजाजीराव दळवी, दत्तरामजी इंगोले पाटील, आशीर्वाद इंगोले, आलोक इंगोले, शामराव पांडे सर, मोतीराम मामा सोनटक्के, अशोकराव गुळगुळे, श्रीकांत राऊत, हनुमंतराव शिंदे, गोविंदराव सुरोसे, गोविंद आसोले, बालाजी काळे, नारायण अवसरमले तसेच गंगुबाई तीरमले आदी मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभली होती.
तसेच यावेळी जयंती मंडळ व सर्व नाभिक समाज बांधवाकडून आलेल्या सर्व मान्यवर बांधव, महिला, तरुण, तरुणाई लहान बालके माता भगिनींसाठी अन्नदानाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे कुरुंदा येथील जयंती मंडळ अध्यक्ष आदेश गुळगुले, उपाध्यक्ष किरण कुमार गुळगुळे, परसराम गुळगुळे, मन्नमथ घेणेकर, राहुल मांदळे, वैजनाथ मोरे, विलास गुळगुळे, स्वप्निल गुळगुळे, गणेश गुळगुळे, वामन मोरे, ज्ञानेश्वर गुळगुळे, गजानन गुळगुळे, मनोज गुळगुळे, संदीप गुळगुळे, नामदेव गुळगुळे, दत्ता काळे, केशव मोरे, गुणाजी मोरे, शिवाजी सोनटक्के, वैजनाथ गुळगुले,रामदास गुळगुळे, गजानन सूर्यवंशी, अरविंद गूळगुळे, नवनाथ गुळगुळे, देवानंद सूर्यवंशी,नागोराव मोरे, व सर्व नाभिक समाज बांधवांकडून शब्दसुमाने ऋण व्यक्त करण्यात आले.
यावेळी आलेल्या मान्यवरांनी शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची कारकीर्द व्यक्त करताना बोलत होते की, नऊ ऑक्टोबर हा विशेष दिन म्हणून शासनाने साजरा करावा असं वक्तव्य यावेळी करण्यात आले. तालुका प्रतिनिधी श्रीकांत बारहाते अँक्टिव्ह मराठी न्यूज हिंगोली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे