नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर नालेगाव सीना नदीला मोठा पूर नागरिकांची नागरिकांचा संपर्क तुटला..
अहिल्यानगर अहमदनगर कल्याण बायपास रोड वरील नेप्ती नाका चौकाजवळच असलेले नालेगाव जवळील सीना नदी पुलाचे काम चालू असताना एका बाजूने छोटा पूल पूर्णपणे वाहून गेलेला दिसतोय आणि त्यामध्ये ब्रिजचे देखील काम चालू आहे पावसामध्ये काम करणे योग्य आहे का ?अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक पोल्स वायरिंग पूर्णपणे तुटले गेले आहेत. पाण्याचा प्रवाह वाढल्याने छोटा पूल वाहून जाऊन पाणी वाहत आहे निफ्टी नाका ते शिवाजीनगर संपर्क पूर्णपणे तुटला आहे. महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची ब्रॅकेट रोड वरती लावले नसल्याने नागरिक मुलाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे.तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नागरिकांनी शिवाजीनगर कल्याण रोड वरील पुलापासून जाणे टाळावे. अँक्टिव्ह मराठीशी बोलतानाअशा प्रतिक्रिया संभाजी राजे कदम यांनी दिले आहेत. नागरिकांची ओरड आहे की लवकरात लवकर ब्रिजचे काम पूर्ण व्हावे . नागरिकांमध्ये अशाचर्चा होत आहे. नगर शहरामध्ये महानगरपालिका, विद्युत महावितरण, व पोलीस प्रशासन शहरात सतर्क, यंत्रणा फास्ट नसल्याचे दिसून येत आहे. मागच्या वेळेस ज्यावेळेस सीना नदीला पूर आलता त्यावेळेस देशी देखील ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ब्रिज करण्याची मागणी केली होती.त्यावेळेस जुना पूल वाहून जाऊन देव तर चे नावाचा व्यक्ती वाहून गेला व त्यानंतर अजून दोन ते तीन व्यक्ती मृत अवस्थेत सापडले होते . देवतरसे नावाची व्यक्ती जनतेसमोर वाहून गेले. तीन दिवसानंतर ते निष्पन्न झाले होते. तरी लवकरच कल्याण रोडवरील शिवाजीनगर ,नालेगाव भागातील नागरिक लवकरच उपोषण करनार असल्याचे म्हटले आहे.अन्यथा सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील. अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. संपादक उमेश साठे अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर, अहमदनगर











