Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक

शहरातील झेंडीगेट परीसरात कत्तलीकरिता आणलेल्या एकुण- 09 गोवंश जातीच्या जनावरांची कोतवाली पोलीसांनी केली सुटका…

शहर प्रतिनिधी सागर संबबन.ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

शहरातील झेंडीगेट परीसरात कत्तलीकरिता आणलेल्या एकुण- 09 गोवंश जातीच्या जनावरांची कोतवाली पोलीसांनी केली सुटका…

अहिल्यानगर (अँक्टिव्ह मराठी) शहर प्रतिनिधी दि.19/04/2025 रोजी मध्यरात्री काही गोवंशीय जनावरे कत्तली करिता दाटीवाटीने बांधुन ठेवले असल्याबाबत पोलीस निरीक्षक कोकरे साहेब यांना माहीती प्राप्त झाली. त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि. योगिता कोकाटे यांना पोलीस स्टाफ व पंचासह बातमीतील नमुद ठिकाणी जावुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
झेंडी गेट परिसरात बाबा बंगाली गल्ली, कुरेशी मोहल्ला या ठिकाणी 00.30 वा. छापा टाकुन कारवाई केली. पोलीसांनी पंचासमक्ष कारवाईत 09 लहाण मोठी गोवंश जातीची जनावरे असा एकुण 1,25,000/- रु किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेतला. आरोपी 1) अल्ताफ खलील कुरेशी, वय- 50 वर्षे, 2) अरताफ अल्ताफ कुरेशी, वय-24 वर्षे, दोन्ही रा. बाबा बंगाली, सार्वजनिक शौचालयाचे पाठीमागे, झेंडीगेट, अहिल्यानगर यांचेविरुध्द सरकारतर्फ कोतवाली पोलीस स्टेशनला गु.र.नं. 366/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 (क), 9 (अ), सह प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली गोवंशीयजातीची एकुण-09 जनावरे पांजरपोळ, गोरक्षण संस्था, अरणगाव येथे सुस्थितीत जमा करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. 1212 इनामदार हे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री. अमोल भारती, सो यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि. योगिता कोकाटे, पो.हे.कॉ.विशाल दळवी, संदिप पितळे, म.पो.हे.कॉ. रोहीणी दरंदले, पो.कॉ. दिपक रोहोकले, तानाजी पवार, सुरज कदम, अभय कदम, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, राम हंडाळ, सचिन लोळगे, सोमनाथ केकाण, महेश पवार, सोमनाथ राऊत, म.पो.कॉ. प्रतिभा नागरे यांनी केली आहे. ,,
शहर प्रतिनिधी .सागर सब्बन ॲक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे