वैश्य नागरी सहकारी बँक लि.परभणीच्या वसमत शाखेचा शनिवारी भव्य शुभारंभ
वैश्य नागरी सहकारी बँक लि.परभणीच्या वसमत शाखेचा शनिवारी भव्य शुभारंभ

वसमत.( प्रतिनिधी).८नोव्हेंबर
परभणी येथील वैश्य नागरी सहकारी बँकेच्या वसमत येथील नुतन शाखेचा उद्घाटन कार्यक्रम दिनांक ९ नोव्हेंबर २०२४ शनिवारी सकाळी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वेदशास्त्रसंपन्न श्री बाळु गुरु असोलेकर महाराज यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मा.मा.जाधव व अध्यक्ष म्हणून
वैश्य नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री सुधाकर चिद्रवार यांची उपस्थिती राहणार आहे.
वैश्य नागरी सहकारी बँक ही शासनाचा सहकार भूषण व सहकार निष्ठ पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक असुन संपूर्ण डिजिटल सेवा प्रदान केली जाते. तसेच एटीएम, फोन पे , ऑनलाइन बँकिंग,लाॅकर,जीएसटी,पीएफ, आयकर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. विशेष सुविधा म्हणून वीज बील भरणा, फ्रंकिंग सुविधा तसेच जेष्ठ नागरिकांना घरपोच एटीएम सुविधा उपलब्ध आहेत. सोबतच इतर अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. तरी वसमत शहरातील नागरिकांनी एकवेळ बॅंकेच्या शाखेला भेट द्यावी व सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री अभय कोसलगे व स्थानिक सल्लागार सदस्य यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट अनिल मुगुटकर, अँक्टिव्ह मराठी न्युज,वसमत हिंगोली.







