*अबकड वर्गीकरणासाठी नायगाव येथील हेडगेवार चौकात लोकस्वराज्य आंदोलनाचा रास्ता रोको..*
अनुसूचित जाती प्रवर्गामधून अ ब क ड वर्गीकरण तात्काळ करण्यात यावे या मुख्य मागणीसह समाज हिताच्या अनेक मागण्या करिता गेल्या आठ दिवसापासून लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रमुख प्रा. रामचंद्र भरांडे यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करीत असून अजूनही शासनाने दखल न घेतल्यामुळे सदर उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी नायगाव येथील हेडगेवार चौकात दि.8जुलै रोजी रास्ता रोको करण्यात आला आहे.
अबकड आरक्षण वर्गीकरणासाठी व इतर मागण्या संदर्भात एक जुलै पासून प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांचे उपोषण चालू असून आठ दिवस उलटून गेले तरीही परंतु शासन व प्रशासन प्रतिनिधी यांनी चर्चेसाठी उपोषण स्थळी भेट दिली नाही उपोषणकर्त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे म्हणून शासनकर्त्याचा रोष व्यक्त करीत प्राध्यापक भरांडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी रावसाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये नायगाव येथील मुख्य चौकात रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केलेला आहे. यावेळी शेषराव रोडे, गणपत रेड्डी,डि.के. पवार, गणपत पवार, शिवाजी पवार, राजेंद्र रेड्डी ,पंढरी वाघमारे, उमराव पवार, चंद्रकांत सूर्यतळ, चंपती नामेवार,माधव पवार, दत्ता पवार,सखाराम पवार, नारायण गायकवाड, आर ए पवार, नागोराव सुर्यवंशी,देविदास पवार, दिलीप पवार, प्रभाकर पवार, चांदू पवार,प्रकाश रुईकर, हनुमंत ईबितवार, जयवंत ईबितवार, सटवाजी पवार यासह अनेक कार्यकर्त्यांची व समाज बांधवांची उपस्थिती होते.
वरिष्ठ नेत्यांना आपल्या मागण्या संदर्भात तात्काळ निवेदन सादर करू—– खा.वसंतराव चव्हाण
नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे चालू असलेल्या उपोषण स्थळी खासदार वसंतराव चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या मागण्या संदर्भात तात्काळ निवेदन वरिष्ठ नेत्यांना सादर करू असे आश्वासन दिले आहे. तालुका प्रतिनिधी अशोक वाघमारे अँक्टिव्ह मराठी न्यूज. नायगाव नांदेड.







