राज्यस्तरीय खोखो पंच शिबिराचे आयोजन*
वसमत……
महाराष्ट्र खोखो असोसिएशन व हिंगोली जिल्हा ॲम्युचर खोखो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024-25 यावर्षी चे राज्यस्तरीय खोखो पंच शिबिर दि. 27 व 28 जुलै 2024 रोजी, मयूर मंगल कार्यालय, वसमत जि. हिंगोली येथे आयोजित केले जाणार आहे. शिवेश्वर बँकेचे अध्यक्ष श्री शिवदासजी बोड्डेवार यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या राज्यस्तरीय खोखो पंच शिबिरासाठी राज्यातील 24 जिल्ह्यातील जवळपास 300 पंच व राज्य खोखो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरामध्ये खोखो खेळाविषयी विविध चर्चा सत्रे आयोजित केली जाणार असून त्यामुळे नवीन पंचाना नियमाबाबतीत असणारी अस्पष्टता दूर केली जाणार आहे. यात स्लाईड शो, पुर्वीच्या सामन्यातील चलचित्रे, गुणपत्रक दाखवून त्यातील निर्णयाबाबत देखील चर्चा करण्यात येणार आहे.
सदर राज्यस्तर खोखो पंच शिबिरामध्ये पुर्णवेळ उपस्थित राहणाऱ्या पंचानांच या वर्षी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता नियुक्ती देण्यात येणार आहे.
सदर राज्यस्तरीय खोखो पंच शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा खोखो संघटनेचे अध्यक्ष तथा शिवेश्वर नागरी सहकारी बँक वसमतचे अध्यक्ष श्री शिवदास बोड्डेवार, जिल्हा खोखो संघटनेचे उपाध्यक्षा मनीषा काटकर, उपाध्यक्ष संदीप सोनी, महाराष्ट्र खोखो असोसिएशन तांत्रिक समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा ॲम्युचर खोखो असोसिएशन चे सचिव प्रा.डॉ.श्री. नागनाथ गजमल सर, शिवाजी कट्टेकर, प्रा. मिनानाथ गोमचाळे, बाळासाहेब कोसलगे, प्रा डॉ अनिल मुगुटकर, श्री प्रवीण शेळके, नाना शिंदे, अमोल मुटकुळे, मारोती अलकटवार, सुरज शिंदे, चिरंजीवी कट्टा, मनोज टेकाळे हे प्रयत्न करत आहेत.
ब्युरो रिपोर्ट अनिल मुगुटकर, अँक्टिव मराठी न्युज, वसमत हिंगोली.







