बहुजन भारत पार्टीच्या वतीने पुण्यात “आरक्षण वर्गीकरण आणि आरक्षण” परिसंवादाचे आयोजन !*
बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. व्यंकटेश कसबे यांच्या विधानसभा निहाय दौ-याच्या पहिल्या टप्प्याचा समारोप 14 जुलै 2024 रोजी पुण्यात संपन्न होत आहे. 25 जुन 2024 रोजी लातूर ग्रामिण विधानसभे पासून सुरू झालेला हा दौरा लातूर, नांदेड, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील एकूण 35 विधानसभा क्षेत्रातून पार पडला. प्रत्येक दिवशी दोन ते तीन विधानसभेतील उमेदवार चाचपणी, संघटन बांधणी आणि निवडणुकीसाठी संसाधने जमवा जमवीच्या उद्देशाने प्रेररीत असलेला हा दौरा बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे पक्षाचे प्रदेश महासचिव श्री. इंज. सुरेश जगधने यांनी वार्ताहाराशी बोलताना सांगितले. पक्षाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज यांचा जयंती समारोह साजरा करून या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याचा समारोप केला जात आहे. त्यानिमित्ताने 14 जुलै 2024 रोजी पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, माल धक्का पुणे येथे ठीक दुपारी 12: 00 वाजता “आरक्षण वर्गीकरण आणि आरक्षण” या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादास उद्घाटक म्हणून ओबीसी बहुजन पक्षाचे नेते प्रा. श्रावण देवरे, प्रमुख अतिथी म्हणून सौ. सुरेखा पुणेकर (लावणी सम्राज्ञी) तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. व्यंकटेश कसबे हे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शंकरराव तडाखे, अण्णाजी धगाटे (बी बी पी पोलुट बिरो सदस्य), भगवान वैरागर (बहुजन नेते) यांच्यासह पक्षाचे रा. कोषाध्यक्ष बालाजी गजले, सौ वैशालीताई थोरात महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष, इंज. प्रकाश गायकवाड प्रदेश महासचिव, प्रदेश सचिव जी. बी. खंडागळे, डॉ. एच.पी बोयाळे, श्री जगदीश मानवतकर, एड. नितीन पोळ, एड. राजु कलाने, राजेश लोहेकर, प्रभाकर वाघमारे, शिवाजीराव खादीवाले इत्यादी पक्षाचे पदाधिकारी, समर्थक महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातून आरक्षण वर्गीकरण आणि आरक्षण या विषयावर संविधानिक आणि नैतिकतेच्या आधाराने बहुजन समाजातील विविध जाती समूहांना समग्र दिशादर्शन होणार आहे. बहुजन भारत पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक बहुजन विचारधारेच्या हितचिंतकांनी याचा लाभ घ्यावा, असे अवाहन पक्षाचे प्रदेश महासचिव श्री. सुरेश जगधने यांनी केले आहे. उत्तर विभागीय संपादक दत्ताजी जोगदंड अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी. अहमदनगर







