राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बारामती मध्ये जनसन्मान रॅली पार पडली.*


बारामती. दि. 15 जुलै.( तालुका प्रतिनिधी) : 14 जुलै रोजी बारामती येथील मिशन हायस्कूलच्या मैदानावर. जनसंमन रॅली पार पडत असताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार सुद्धा जोरदार तयारीला लागलेले दिसून येत आहेत. विधानसभेला महायुतीला निवडून द्यायचं आहे, हवसे, नवसे, गवसे येतील, पण अजित दादा हा शब्द देणारा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची जन सन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. विकासाचं ध्येय ठेवून पुढे जायचं आहे. मला बारामती बघत इतर तालुके, पुणे, महाराष्ट्र फिरायचा आहे. इथल्या लोकांची जबाबदारी पाळायची असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
संविधानाला कोणी धक्का लावणार नाही : अजित पवार
म्हणाले की, चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला कोणी धक्का लावणार नाही. ते पुढे म्हणाले कि, आम्ही खोटे बोलणार नाही. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. सत्ता येत असते, जात असते. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही. सत्तेचा वापर गरिबांसाठी झाला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. एमएसपी संदर्भात बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, मी काल अमित शाह यांची भेट घेतली व साखरेच्या संदर्भात त्यांच्याशी बोलणी केली. एमएसपी वाढवायला पाहिजे असं त्यांना सांगितलं. त्या संदर्भातील निवेदन त्यांना उद्या देणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही, आम्ही कोणाला धक्का लावू देणार नाही, हा तुमच्या दादाचा वादा आहे.
21 जुलै रोजी पुणे दौऱ्यावर येणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. कांदा, दूध पावडर आयात केलेली नाही. जगाची आर्थिक राजधानी मुंबई करायची आहे. चुकीच्या प्रचारावर जो काही नॅरेटिव्ह सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यावर विश्वास ठेवू नका असे अजित पवार यांनी सांगितले.
जोमाने बरसणाऱ्या पावसाची कसलीही तमा न बाळगता आमची मायबाप जनता आमच्यासाठी थांबली, हीच आम्ही आजपर्यंत जनतेसाठी केलेल्या कार्याची पोचपावती आहे ! जनतेच्या अखंड प्रेमाशिवाय माझ्यासारख्या जनसेवकाला अजून काय हवं असतं? तुमच्या अभूतपूर्व अशा प्रतिसादाने आज मी धन्य झालो आहे.असे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, राज्यसभा सदस्य खा. सुनेत्राताई पवार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका प्रतिनिधी दत्ताजी चांदणे सह बारामती तालुका विभागीय संपादक किरण बोराडे. अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती. पुणे.







