Breaking
ब्रेकिंगराजकिय

रक्षाबंधनला बहिणीच्या खात्यावर पडणार 3 हजार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा*

0 1 4 7 2 7

बारामती प्रतिनिधी १५ जुलै. बारामती येथील आयोजित राष्ट्रवादी जनसन्मान महामेळावा नुकताच पार पडला मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेतून राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. रक्षाबंधनाच्या काळात बँकेच्या खात्यावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
बारामतीचा विचार केल्यास बारामती मध्ये साधारण वर्षाला १८० कोटींची रक्कम मिळणार आहे तर सगळ्या राज्यात एकूण ४६ हजार कोटींची रक्कम मिळणार आहे. महिला भगिनी आत्मनिर्भर व्हावी यासाठी त्यांना प्रतिवर्ष १८ हजार रुपये देण्याचे काम महायुतीच्या माध्यमातून होत आहे. यात सातत्यपणा टिकवायचा आहे. त्यामुळे विधानसभेतही महायुतीला निवडून द्यायचे आहे. तरच पुढे ही योजना चालणार आहे. महिला भगिनींना कायमचे पैसे मिळणार आहेत. हौसे नवशे गवशे येतील काही सांगायचा प्रयत्न करतील पण अजित पवार शब्दाचा पक्का आहे. तो बदलणार नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या योजनांचे निर्णय सांगत विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून देण्याचे आवाहन करीत विधानसभेचे रणशिंग फुंकले. बारामती येथे आयोजित राष्ट्रवादी जनसन्मान महामेळाव्याच्या जाहीर सभेत पवार बोलत होते. पवार म्हणाले जनसन्मान रँली विधान सभेचे मतदान येईपर्यंत थांबणार नाही. आमची फुले शाहु आंबेडकरांची विचारधारा आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. इंदू मिलच्या जागेवर डॉ.आंबेडकर यांच्या चांगल्या स्मारकाचे काम होत आहे.
शाहु -फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात काम करताना कुठल्याही जातीधर्माच्या व्यक्तीवर अन्याय होणार नाही. सर्वसामान्यांसाठी झाला पाहिजे डॉ. आंबेडकरांच्या घटनेला जिवात जीव आहे. तोपर्यंत कोणी धक्का लावणार नाही. चंद्र -सुर्य जोपर्यंत आहे. तोपर्यंत संविधानाला धक्का लावू शकत नाही. विश्वास ठेवा. आम्ही शब्दांचे पक्के आहोत. जो वादा करतो तो पुरा करतो. ते सर्वांना माहित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. या वेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. माजी मंत्री बाबा सिद्दीकी. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ. यांच्यासह काही पदाधिकारी यांची भाषणे झाली.कार्यक्रमास खासदार प्रफुल पटेल. सुनील तटकरे. सुनेत्रा पवार. मंत्री छगन भुजबळ. दिलीप वळसे पाटील. आमदार दत्तात्रय भरणे. मंत्री हसन मुश्रीफ. धनंजय मुंडे. संजय बनसोडे. अमोल मिटकरी. शिवाजीराव गर्जे. राजेश वीटकर .सुरज चव्हाण. पार्थ पवार. जय पवार. आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आभार मानले.
*विभागीय शहर संपादक :केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज. बारामती*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे