Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सुनेत्रा पवार यांच्याकडून गुलाबाचं फूल, तर पार्थ पवार यांची मिठी भल्या सकाळी अजितदादांचं ‘बर्थडे सेलिवेशन

0 1 4 7 2 7

सुनेत्रा पवार यांच्याकडून गुलाबाचं फूल, तर पार्थ पवार यांची मिठी भल्या सकाळी अजितदादांचं ‘बर्थडे सेलिवेशन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. आज अजितदादांनी भल्या सकाळी आपल्या पुण्यातील निवासस्थानी कुटुंबियांसमवेत वाढदिवस साजरा केला. खासदार सुनेत्रा पवार यांनी अजितदादांना गुलाबाचं फूल देऊन आणि ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी मिठी मारत शुभेच्छा दिल्या. कुटुंबियांसोबतचं अनोखं सेलिब्रेशन उरकून अजितदादा नगर जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने महिलांशी संवाद साधण्यासाठी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज वाढदिवसादिवशीच अजितदादांनी महिला भगिनींशी संवाद साधण्याचा निर्णय घेत पुण्यातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. तत्पूर्वी सकाळी पुण्यातील जिजाई निवासस्थानी अजितदादांचा वाढदिवस कुटुंबियांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. अजितदादांच्या आई आशाताई पवार, पत्नी खासदार सुनेत्रा पवार, भगिनी विजया पाटील, पुत्र पार्थ आणि जय यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी अजितदादांना गुलाबाचं फूल देत शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांबद्दल अजितदादांनी सोशल मिडियात पोस्ट करत आभार मानले. याचवेळी अजितदादांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी मिठी मारत अजितदादांना शुभेच्छा दिल्या. कुटुंबियांसोबतचं हे अनोखं सेलिब्रेशन उरकून अजितदादांनी निवासस्थानी आलेल्या कार्यकर्त्याच्या शुभेच्छांचाही स्वीकार केला. त्यानंतर ते नगर जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. तालुका विभागीय संपादक किरण बोराडे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे