Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

बहिर्जी स्मारक महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत कार्यक्रम संपन्न .

0 1 4 7 2 7

बहिर्जी स्मारक महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत कार्यक्रम संपन्न .

वसमत. दिनांक 27 ऑगस्ट (प्रतिनिधी)
येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात विज्ञान विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दि 27 ऑगस्ट रोजी विज्ञान विभागातील प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीसाठी स्वागत कार्यक्रम व प्रेरण कार्यक्रम ( इंडक्शन प्रोग्राम ) आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम एम जाधव हे होते तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ डी आर मुंढे व तसेच आय क्यू ए सी समन्वयक डॉ करूणा देशमुख , सांकृतिक विभागचे डॉ सुभाष क्षीरसागर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमधिकारी डॉ स्वाती पाटील, क्रीडा संचालक प्रा निरंजन अकमार, ग्रंथपाल डॉ सविता अवचार , आदि मान्यवर उपस्थित होते . यावेळी बी एस्सी व एम. एस्सी. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना विज्ञान विभागातर्फे पेन व पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते देऊन स्वागत करण्यात आले . डॉ मुंढे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व प्रेरण कार्यक्रम आयोजनाचा उद्देश सांगीतला. यावेळी त्यांनी शैक्षणिक धोरणाचा नवीन मसुदा सांगुन यामध्ये जवळपास ३५ वर्षानंतर केलेले धोरणात्मक बदल हे विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिक यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी ग्रंथपाल डॉ अवचार , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ क्षीरसागर, एनएसएस प्रमुख डॉ स्वाती पाटील, प्रा अकमार यांनी आपल्या विषया संदर्भात माहिती सांगीतली. भौतिकशास्त्र व प्राणी शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पी जी गवळी यांनी केले तर सूत्रसंचालन संयोजक प्रा अनिल कल्याणकर यांनी केले . आभार प्रा सुनील नायक यांनी मानले . या कार्यक्रमास विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व बि. एस्सी, एम एस्सी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .ब्युरो रिपोर्ट अनिल मुगुटकर, अँक्टिव्ह मराठी न्युज. वसमत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे