Breaking
कृषीवार्ताब्रेकिंगसामाजिक

राहुरी शहरात बीबट्याचा मुक्त संचार.. शिवसेना शहर प्रमुख गंगाधर सांगळे..

उत्तर विभागीय उपसंपादक प्रशांत जोशी. अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी

0 1 4 7 2 7

राहुरी शहरात बीबट्याचा मुक्त संचार.. शिवसेना शहर प्रमुख गंगाधर सांगळे..

राहुरी (अँक्टीव्ह मराठी न्युज) प्रतिनिधी उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी .. शिवसेना राहुरी शहर प्रमुख गंगाधर सांगळे यांच्या राहुरी शहरा जवळील शेतामध्ये त्यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर मुळा बळनदीकाठी गोट फार्म असल्याने
दि.18.4.25. वार शुक्रवार या दिवशी तीन बिबटे सांगळे यांच्या शेतामध्ये गोट फॉर्म जवळ असलेल्या गिन्नी गवतामध्ये शुक्रवार या दिवशी चार वाजल्यापासून दडी धरून तीनही बिबटे. बसलेले होते.
हे आम्ही बघितले असता आसपासच्या नागरिकांनी आरडाओरडा केला काही लोकांनी फटाकडे वाजवण्याचा प्रयत्न त्याच क्षणी चेवचाळलेले बिबटे यांनी जवळच असलेली सांगळे यांच्या वस्तीवरील पाळीवकुत्र्यावर झडप घातली आणि कुत्र्याला जबड्यामध्ये धरून एका लिंबाच्या झाडावर जाऊन बसले ही वरील सर्व माहिती गंगाधर सांगळे यांना त्यांच्या घरच्या लोकांनी मोबाईलवर फोन करून कळवली असता सांगळे यांनी ताबडतोब फॉरेस्ट अधिकारी रायकर साहेब यांना कळवली असता रायकर साहेबांनी शासकीय सुट्टी असताना सुद्धा संबंधित फॉरेस्ट अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर माहिती देऊन सांगळे यांच्या शेतामध्ये गोट फार्म जवळ पिंजरा लावण्यास कळवले असता पिंजरा उपलब्ध नसल्याकारणाने जवळच रेल्वे स्टेशनवर जाणारा मधला रोड तनपुरेवाडी वरून जात आहे तेथे पिंजरा उपलब्ध असल्याचे समजले असता तो पिंजरा घेऊन येण्यासाठी सांगळे वस्तीवरील व तनपुरेवाडी परिसरातील सर्व युवाशक्ती धावून आली व त्या क्षणी फॉरेस्ट अधिकारी व कर्मचारी यांना सर्व माहिती दिली असताना सुद्धा कोणी घटनास्थळी आले नाही पिंजरा लावण्यासाठी फॉरेस्ट कर्मचारी व अधिकारी उपस्थित नसताना सुद्धा परिसरातील तरुण युवकांनी पिंजरा व्यवस्थित लावून त्यामध्ये एक बोकड ठेवण्यात आला त्यावेळेस सायंकाळचे सहा वाजले होते
नंतर रात्रीचे दहा ते अकरा वाजता तीनही बिबटे शिकारीच्या दृष्टीने सांगळे यांच्या गोट फार्म जवळ फिरायला लागले
तेथे लावलेला पिंजरा व पिंजऱ्यामधील मधील बोकड ओरडण्याचा आवाज आला त्याच क्षणी तीनही बिबटे पिंजऱ्याच्या दिशेने धावले असता मादी जातीचा बिबट्या क्षणाचाही विलंब न लावता पिंजऱ्यामध्ये घुसला त्याच शनि पिंजऱ्याचा दरवाजा बंद झाला व जोराचा आवाज आला जवळील राहत असलेले सर्व ग्रामस्थ नागरिक सांगळे कॉलनी मधील सर्व रहिवासी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले परंतु परिसरातील सर्व युवकांनी मोबाईल द्वारे प्रत्येकाला फोनवर माहिती देऊन पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला असल्याची माहिती दिली व समक्ष जाऊन पाणी केली असता खरोखर पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्याचे निदर्शनात आले त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते क्षणाचा विलंब न लावता फॉरेस्ट अधिकारी लोकांना सर्व माहिती दिली त्यानंतर रात्री एक ते दीडशे दरम्यान फॉरेस्ट खात्याचे कर्मचारी व अधिकारी पिंजऱ्यामध्ये अडकलेला बिबट्याची पाहणी करण्यासाठी सांगळे यांच्या वस्तीवर आले पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या बिबट्याला घेऊन दिग्रस येथील फॉरेस्ट खात्यामध्ये बिबट्या ला घेऊन गेले व राहिलेले दोन बिबटे पकडण्यासाठी आम्ही पिंजऱ्याची मागणी केली असता फॉरेस्ट अधिकारी यांनी आम्हाला तुमचे साधन घेऊन येऊन उद्या दुपारी तीन वाजता दिग्रस येथील फॉरेस्ट खात्यामधून पिंजरा घेऊन जाणेस सांगितले आमचे असे निदर्शनात आले आहे की फॉरेस्ट खात्याचा कारभार निष्काळजीपणाचा असल्याचे समजले कारण सांगळे वस्तीवर तीन बिबटे असल्याची माहिती देऊन सुद्धा फॉरेस्ट अधिकारी व कर्मचारी यांनी वरील घटना गांभीर्याने घेतली नाही
त्याबद्दल शिवसेना राहुरी शहर प्रमुख.गंगाधर सांगळे यांनी वरिष्ठ खात्याच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली सांगळे यांच्या शेतावरील गोट फार्म जवळील राहिलेले दोन बिबटे
यांनी पकडलेल्या मादीच्या शोधासाठी सांगळे यांच्या शेतामध्ये खूप धिंगाणा केला व उग्र रूप धारण करून आरडा ओरडा केला असता सांगळे यांचे शेतामधील पिकाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे
त्या नुकसानीची भरपाई शासन देणार का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
ही वरील सर्व माहिती आम्ही मोबाईल फोन द्वारे फॉरेस्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना कळविली असताना सुद्धा त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले नाही आमच्या जवळील सर्व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुद्धा फॉरेस्ट अधिकारी लोकांनी परिस्थितीचे महत्त्व लक्षात न घेता
पिंजरे लावण्यापासून ते बिबटे पकडण्यापर्यंत सर्व कारवाई संबंधित जवळील नागरिकाकडून करून घेतली आहे
असा हा फॉरेस्ट खात्याचा गलथान कारभार संबंधी वन खात्याचे मंत्री यांचे सचिवलयात कळविले जाणार आहे व संबंधित खात्याची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येणार आहे
याची फॉरेस्ट खात्याच्या अधिकारी व कर्मचारी लोकांनी याची नोंद घ्यावी
संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना विनंती करून सुद्धा
त्यांनी वरील बिबट्याच्या संदर्भातील तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही
याच गोष्टीचे वाईट वाटते भरमसाठ शासनाचा पगार घेऊन सुस्त झालेल्या अधिकाऱ्यांची झोप केव्हा जाणार
त्यासाठी वरील सर्व प्रकारची अधिकाऱ्यांच्या बाबतीत सविस्तर माहिती कळवली जाणार .ॲक्टिव्ह मराठी न्यूज राहूरी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे