Breaking
ब्रेकिंग

धनगर समाजाचा जितुंर फाटा येथे रास्ता रोको: वाहनांच्या दोन किलोमीटर दूर लांबच लांब रांगा..!

0 1 4 7 2 7

धनगर समाजाचा जितुंर फाटा येथे रास्ता रोको: वाहनांच्या दोन किलोमीटर दूर लांबच लांब रांगा..!
वसमत हिंगोली (प्रतिनिधी) 25 सप्टेंबर हिंगोलीच्या वसमत शहरा लगद असलेल्या जिंतूर फाटा चौकात धनगर समाजाच्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून जितुंर फाटा येथे आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता च्या सुमारास असंख्य धनगर बांधवान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यामध्ये वाहनांच्या दोन किलो मीटर रांगा लागल्या होत्या तर धनगर समाज यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून गेल्या सोळा दिवसांपासून पंढरपूर, नेवासा, लातूर येथे उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांना पाठिंबा म्हणून हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये राज्य महामार्ग रस्त्यावर वाहनांच्या दोन किलो मीटर अंतरावर रांगा लागल्या होत्या धनगर समाज बांधव यांची आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणाबाजी ने परीसर दणाणून सोडला गेला.
या वेळी महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी प्रियांका खडसे तलाठी उज्वला मैड वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कांचमाडे पोलिस उपनिरीक्षक सिद्दिकी यांनी समाजाच्या मागणीचे निवेदन घेतले तसेच यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब बारहाते प्रल्हाद जहाने लिंबाजी उन्हाळे बाजार समितीचे संचालक गणपतराव तागडे माजी संचालक विश्वनाथ गवारे शालेय व्यवस्थापन समितीचे गिरगाव अध्यक्ष प्रभाकर बारसे हिवरा सरपंच बालाजी होळकर धानोरा माजी सरपंच शामराव हिरवे, किशन होळकर मुंजाजी बंडे, उमाकांत काळे गंगाप्रसाद खारोडे, जळबाजी पारटकर, दामोदर होळकर ओमप्रकाश गंलाडे, एकनाथ साखरे काशिनाथ बारसे, संभाजी हिरवे दिलिप रेनगडे, बालाजी मुंजाळ, मारोती काळे, बालाजी काळे यांच्या सह तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकांत बारहाते. अँक्टिव्ह मराठी न्यूज. वसमत. हिंगोली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे