Breaking
ब्रेकिंगराजकिय

बारामती तालुक्यात असं एक गाव आहे. त्या गावात दलित लोकवस्तीत न रस्ता आहे? ना लाईट ?…. ‌ होय खरं आणि वास्तव आहे.

0 1 4 7 2 7

बारामती तालुक्यात असं एक गाव आहे. त्या गावात दलित लोकवस्तीत न रस्ता आहे? ना लाईट ?..
‌ *होय खरं आणि वास्तव आहे…
*बारामती (प्रतिनिधी) दि.24 सप्टेंबर तालुक्यात मौजे सोनगाव इनाम पट्टा कांबळे वस्ती या दलित लोकवस्तीवर गेली 28 वर्षापासून रस्ता आणि लाईट पासून वंचित अशी लोकवस्ती अस्तित्वात आहे या संदर्भात 23 सप्टेंबर 2024 पासून तहसीलदार कार्यालय बारामती या ठिकाणी गेले दोन दिवस अमरण उपोषण चालू होते संदर्भात तहसीलदार श्री गणेश शिंदे साहेब, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल साहेब ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्यामार्फत येत्या दहा दिवसात विषय मार्गी लागेल या आशयाचे लेखी पत्र मिळाल्यानंतर श्री गणेश विठ्ठल वायदंडे यांनी उपोषण स्थगित करण्यात आले आहे यावेळी मांतग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून श्री दिलीप नाना सोनवणे- महाराष्ट्र प्रदेश सचिव , पुणे जिल्हाध्यक्ष श्री राजुभाऊ मांढरे, श्री अमॄतराव नेटके वकील-बारामती,श्री लक्ष्मण खंडाळे सोशल मीडिया पुणे जिल्हा प्रमुख, श्री गणेश वायदंडे -बारामती तालुका सचिव,महादेव गायकवाड या वेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे.तालूका प्रतिनिधी किरण बोराडे सह,शहर प्रतिनिधी केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती.

5/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे