साहित्यरत्न लो. आण्णाभाऊ साठे चौकामध्ये हायमास्टर दिवे व सी. सी.टी. व्ही कँमेरे बसवण्याची केदार पाटोळे यांची मागणी.
बारामती(प्रतिनिधी )११ऑक्टोंबर२०२४
साहित्यरत्न लो.आण्णाभाऊ साठे चौकामध्ये हायमास्ट दिवे व तसेच सी.सी.टी.व्ही कँमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली .
केदार देवानंदन पाटोळे
(अध्यक्ष जय लहुजी फ्रेंड सर्कल,) पत्ता : साठे नगर, कसबा, • बारामती जि.पुणे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आणाभाऊ साठे चौकामध्ये हायमास्टर दिवे व सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौका मध्ये आजुबाजुच्या परिसरामध्ये दारूचे दुकाने, तसेच रोजच्या घरगुतीसाठी आवश्यक लागणारे किराणा माल दुकान व चिकन चे दुकान आहे. तसेच महिलांना घराच्या बाहेर आवश्यक कामासाठी किरणाला व इतर वस्तुंची गरज पडल्यास ते घरा बाहेर निघतात. परंतु सदरील चौका मध्ये दारूचे दुकान असल्यामुळे त्याठिकाणी दारू पिऊन लोक भांडण तंटा, महिलांना छेडछाड, मोठयाने शिवीगाळ व दारू पिऊन त्याच ठिकाणी चौकाच्या मध्ये दारूच्या बाटल्या फोडणे व फेकणे हे सतत घडत आहे. त्यामुळे महापुरूष यांच्या नावाची व चौकाची विंटबना होत आहे. तसचे चौकाच्या शेजारी दोन्ही बाजुस दलित वस्ती असल्यामुळे याठिकाणी छेडछाडीचे प्रमाणे वाढत जात आहे. त्यामुळे सदरील ठिकाणचे महिला व इतर नागरिक रहिवासी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
तरी हे रोज रोज होणाऱ्या कृत्यांना महीला भगिनी कंटाळुन गेले आहे. त्यामुळे महिला भगिनींची विनंती की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौका मध्ये हायमास्टर दिवे व सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात यावे जेणे करून या रोजच्या होणारे कृत्य थांबवण्यास मदत होईल अन्यथा होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार राहील असेल. तरी तत्काळ कारवाई करून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात.
आसे निवेदन मा.उपमुख्यधिकारी सौ. मॅडम बारामती नगर परिषद बारामती यांच्याकडे देण्यात आलेले आहे. बारामती विभागीय संपादक केदार पाटोळे ऑक्टिव्ह मराठी न्युज. बारामती.
0
1
4
7
2
7
0
1
4
7
2
7







