Breaking
ब्रेकिंगसामाजिक

जवळा बाजार येथे हिंगोली परभणी रस्त्यावर शेतकरी पुत्र संदिप भैय्या माटेगावकर मित्र मंडळ यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन…

0 1 4 7 2 7

जवळा बाजार येथे हिंगोली परभणी रस्त्यावर शेतकरी पुत्र संदिप भैय्या माटेगावकर मित्र मंडळ यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन…

हिंगोली जवळा बाजार (प्रतिनिधी) दिनांक 11 ऑक्टोंबर. वसमत तालुक्यातील जवळा बाजार येथे दिनांक १०/२०२४ रोजी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या दरम्यान बळीराजाच्या व्यथा आणि वेदनांना वाचा फोडण्यासाठी आयोजित या आंदोलनात प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून उपस्थितांनी संवेदनशीलता जपली यावेळी शेतकरी पुत्र संदिप भैय्या माटेगावकर पुढे बोलताना म्हणाले २०२३-२४ या वर्षात आपल्या सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल तर कापसाला सात हजार विस रुपये एवढा हमीभाव जाहीर करण्यात आला होता मात्र संपूर्ण हंगामात हमीभाव पेक्षाही कमी दर मिळाला हि वस्तुस्थिती कृषी विभागाच्या आकडेवारीतून पुढे आली उत्पादन कमी होऊनही सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा झाला आहे तिकडे कापसाच्या लागवड खर्चात सुद्धा मोठी वाढ झाली आहे कापसाचा वापर आणि मागणी कमी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी याचा हि परीणाम कापूस दरावर पाहायला मिळाला त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळे राज्यसरकारने केंद्र सरकारशी समन्वय साधून माझ्या बळीराजाची भरघोस मदतीसह आपण केलेल्या मागण्या मंजूर केल्या पाहिजेत त्यामुळे आचारसंहितेच्या पुर्वी आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा तुमच्या घरासमोर मोर्चा काढू असा इशारा शेतकरी पुत्र संदिप भैय्या माटेगावकर यांनी दिला यावेळी संदिप भैय्या माटेगावकर मित्र मंडळाचे संपर्कप्रमुख अंगद गोफनवाड कळंबा सरपंच लिंबाजीराव अंभोरे शाम अंभोरे गोपाळ चकोर गोपाळ कावळे बालाजी इंगोले पांडुरंग कावळे संतोष कावळे निवृत्ती भालेराव कुलदीप चकोर भागवत दशरथे गोपाळ गरुड कल्याण भालेराव आदींनी परिश्रम घेतले यावेळी संदिप भैय्या मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसमत तालुका प्रतिनिधी श्रीकांत बाराहाते अँक्टिव्ह मराठी न्यूज. वसमत. हिंगोली.

1/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे