Breaking
कृषीवार्ताब्रेकिंग

तरुण युवक युवतींनी नैसर्गिक शेतीची सुत्रे आत्मसात केली पाहिजे डॉ. कौशिक* *ग्रामीण युवकांसाठी सेंद्रिय कृषि निविष्ठा निर्मिती आणि त्यांचा शेतीमध्ये वापर प्रशिक्षण*

0 1 4 7 2 7

*तरुण युवक युवतींनी नैसर्गिक शेतीची सुत्रे आत्मसात केली पाहिजे डॉ. कौशिक*
*ग्रामीण युवकांसाठी सेंद्रिय कृषि निविष्ठा निर्मिती आणि त्यांचा शेतीमध्ये वापर प्रशिक्षण*

शेवगाव कुकाना (प्रतिनिधी)दि. 11 ऑक्टोंबर भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने हे मा. आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील अध्यक्ष, मा.आ. श्री. चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष, मा. डॉ. क्षितीज घुले पाटील, तज्ञ विश्वस्त आणि सर्व विश्वस्त मंडळ श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था यांचे मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहे. कृषि क्षेत्रात वाढत्या रासायनिक खते, किटकनाशक आणि बुरशीनाशक यांचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळेच कॅन्सर, शुगर आणि बी.पी. सारख्या आजारास बरीच जनता बळी पडत आहे. या सर्वांपासून दूर राहायचे असल्यास युवकांनी नैसर्गिक पद्धतीने कृषि निविष्ठा तयार करून त्यांचा वापर आपल्या शेतीमध्ये करणे गरजेचे असल्याचे डॉ. एस.एस. कौशिक , प्रमुख व वरिष्ठ शास्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने यांनी सांगितले.

कृषि विज्ञान केंद्र दहीगाव ने अंतर्गत ग्रामीण भागातील १५ ते ३५ वयोगटातील तरुण तरुणीसाठी ५ दिवस ग्रामीण युवक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. एस.एस. कौशिक, श्री. सोपानराव मते सर, इंजि राहुल पाटील, अंबुले सर, पवार सर हे या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. कौशिक यांनी नैसर्गिक शेती, नैसर्गिक शेतीची संकल्पना , नैसर्गिक शेती मध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध कृषि निविष्ठा यांच्या विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री. सोपानराव मते सरांनी तरुण आणि तरुणींनी शेती संबंधी आवश्यक गोष्टींचे प्रशिक्षण घेऊन त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये करण्याचे आवाहन केले.
डॉ. भास्कर ताकटे, माती पाणी आणि जैविक खते निर्मिती प्रयोगशाळा प्रमुख श्री. मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी जैविक खते निर्मिती व मायको-हायझा उत्पादन आणि त्यांचा शेतीमध्ये वापर या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रशिषणात सहभागी प्रशिणाक्षांर्थी यांचे कडून विविध जैविक खते निर्मिती तसेच मायको-हायझा निर्मिती व त्यांची पॅकिंग यांचे स्वतः प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन कृषि विद्या विभाग कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने यांच्या अंतर्गत केल्याचे श्री. नारायण निबे , विषय विशेषज्ञ (कृषि विद्या ) यांनी सांगितले. या प्रशिक्षणात जवळजवळ १२ महिला तसेच ३४ युवकांनी सहभाग घेतला .शेवगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण देशमुख ॲक्टिव्ह मराठी न्यूज. शेवगाव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे