Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

स्वराज्य शिक्षक संघ विभागीय मेळाव्याचे औचित्य साधून.स्वराज्य शिक्षक संघाच्या राज्यउपाध्यक्ष पदी रमेश जावळे तर जिल्हाध्यक्ष पदी अविनाश पवार यांची नियुक्ती.

0 1 4 7 2 7

स्वराज्य शिक्षक संघ विभागीय मेळाव्याचे औचित्य साधून.स्वराज्य शिक्षक संघाच्या राज्यउपाध्यक्ष पदी रमेश जावळे तर जिल्हाध्यक्ष पदी अविनाश पवार यांची नियुक्ती*.

हिंगोली.(अँक्टिव्ह मराठी) जिल्हा विभागीय प्रतिनिधी:- रवि कुंटे
हिंगोली:राज्यात स्वयंसेवी संस्थाद्वारा अनुदानित तत्त्वावर ९७७ खाजगी प्राथमिक, मध्यामिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येतात. सदर आश्रम शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात स्वराज्य शिक्षक संघ द्वारा आयोजित विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रम शाळेचे शिल्पकार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक. तथा सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य शिक्षक संघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य संघटक बबनराव वाघमारे धाराशिव जिल्हाध्यक्ष औदुंबर जगताप मराठवाडा विभागीय अध्यक्ष, पुरुषोत्तम माने ,अशोक सूर्यवंशी ,बालासाहेब कराड होते काही अपरिहार्य कारणास्तव मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे व आमदार राजू नवघरे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही तर त्यांनी भ्रमणध्वनी द्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करून आश्रम शाळेतील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले या प्रसंगी रमेश जावळे यांची स्वराज्य शिक्षक संघ च्या राज्य उपाध्यक्ष , विशाल जाधव यांची राज्य समन्वयक तथा अविनाश पवार यांची सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण बोडखे यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश दवणे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसंत भुसारी, विठ्ठल गिरी, अनिल राठोड ,प्रेमानंद धांडे, व्यंकटी पिंपळपल्ले ,देविदास पाईकराव, प्रमोद कदम ,देविदास सापनर, न्यायपाल बनसोडे ,रामा इंगोले, पंढरीनाथ झुंजारे उल्हास जाधव आदीने परिश्रम घेतले.
अँक्टिव्ह मराठी न्युज. जिल्हा विभागीय प्रतिनिधी रवि कुंटे, हिंगोली.परभणी. नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे