माळेगाव, बारामती येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा.

माळेगाव, बारामती येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा.*
बारामती प्रतिनिधी :दि २७ नोव्हेंबर २०२४
भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ असुन प्रत्येक नागरिकाला संविधानामुळे प्रतिष्ठा प्राप्त
झाली आहे असे प्रतिपादन डॉ. के. सम्मी रेड्डी यांनी केले. राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन
संस्था माळेगांव खुर्द येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधान
उद्देशिका सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी योगेश भोसले व संदीप आढाव यांनी
भारतीय संविधान उद्देशिका फ्रेम भेट दिली. यावेळी मुख्याधिकारी बालाजी लोंढे, सहाय्यक
पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, सरपंच आदित्य काटे, बारामती तालुका मराठी पत्रकार
संघाचे अध्यक्ष योगेश भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपनिरीक्षक देविदास
साळवे, विश्वास भोसले, चंद्रकांत वाघमोडे, परशुराम आडके, अनिल मदने, संग्राम भोसले,
योगेश खोमणे, शास्त्रज्ञ, पोलिस पाटील व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन दिनेश टेकवाणी, तर आभार दयानंद खरात यांनी मानले. दरम्यान माळेगाव
नगर पंचायत, माळेगाव पोलिस ठाणे येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
तसेच मुंबई येथे २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या
पोलिस अधिकारी, कर्मचारी, निष्पाप नागरिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.बारामती विभागीय संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती.







