गिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रामाणिक प्रयत्नाला यश.. *49.95 गुण घेऊन एकॉन्स मध्ये महाराष्ट्र राज्य मधून गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रथम क्रमांकावर सर्व स्तरातून कौतुकाची थाप..
जिल्हा प्रतिनिधी रवींद्र कुंटे ॲक्टिव्ह मराठी न्यूज वसमत. हिंगोली.

गिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रामाणिक प्रयत्नाला यश..
*49.95 गुण घेऊन एकॉन्स मध्ये महाराष्ट्र राज्य मधून गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रथम क्रमांकावर सर्व स्तरातून कौतुकाची थाप..*
विभागीय हिंगोली जिल्हा प्रतिनिधी – रवि कुंटे
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील मोठ्या संख्येचे गिरगाव हे गाव असुन सामाजिक व शैक्षणिक राजकीय तसेच धार्मिक बाबीत अग्रेसर असणारे गिरगाव, पण आरोग्य राखण्यात कुठेतरी मागे पडले होते हे स्पष्ट मान्य करावेच लागेल.
शासकीय आरोग्य सेवा हि तर पुर्वी पासुन मिळायची पण त्यात सातत्य नव्हते,कर्मचारी डॉ.यांची रेलचेल नसायची पण गावांतील जेष्ठ नागरिक शंकरराव नादरे पाटील यांनी तत्कालीन मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा करत प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केली, आणि ती मंजुर देखील करण्यात आली. पण मिळालेल्या मंजुरीला कुठे थांबा मिळाला माहिती नव्हते, पुन्हा २००५ मध्ये माजी राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या कडे शंकरराव पाटील यांनी तगादा धरला, तरुणांना सोबत घेऊन अमरण उपोषणाचा गर्भित इशारा दिल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली, आणि पुढील काळात चार एकर क्षेत्रावर भव्य अशी इमारत उभी राहिली.
त्यानंतर मात्र हळुहळू कामाचं चक्र फिरण्याची गती मिळाली मागील,२००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य राहिलेले रवि नादरे पाटील यांनी यंत्रणा वाढवली, पुढचे जिल्हा परिषद सदस्य गौतम दवणे यांनी देखील प्रयत्न चालू ठेवले, अनेक नविन कर्मचारी यांच्या जागा भरण्यात आल्या, २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य विलासराव रायवाडे यांनी देखील अतोनात प्रयत्न करून जिल्हा परिषद च्या माध्यमातुन अनेक निधी प्राप्त करून दिला गेला. आरोग्य केंद्राच्या विविध मागणीला पुढे आणले आणि कार्य केले, ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने व लोकप्रतिनिधी आणि सरपंच यांच्या वतीने नेहमीच आरोग्य केंद्राच्या हितासाठी प्रयत्न केले ते आजपर्यंत टिकून आहेत.
गिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्र हे छञपती संभाजी नगर विभागातून प्रथम पुरस्कार प्रदान करणारे राज्यातील एकमेव आरोग्य केंद्र ठरले आहे.
मागील महिन्यांत २४ ते २५ जानेवारीला राजस्थान व मध्यप्रदेश येथील Nqas तपासणी करीता डॉ.किरण नागपाल व डॉ.अखीला अन्सारी Nqas ( राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक मानके ) यांचे पथक देखील तपासणी साठी गिरगांव मध्ये दाखल झाले होते. राज्यात सर्वाधिक गुण मिळवुन, छत्रपती संभाजी नगर विभागातून प्रथम नामांकन मिळालं आहे. या मध्ये प्रामुख्याने सहा विभागाची रेकॉर्ड तपासणी करण्यात आली होती. observation व staf interview घेतला गेला, त्यामध्ये प्रसुती विभाग, लॅब, जनरल ॲडमिनिट्रेशन, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, बाह्यरुग्ण, अंतररुग्ण, अशा विविध विभागाची रेकॉर्ड तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात आला.
या सर्व घडामोडींकडे स्वतः माननीय जिल्हाधिकारी श्री अभिनव गोयल आणि मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले मॅडम यांनी लक्ष वेधले होते, त्यांनी गिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व व्यवस्थापन यांची माहिती घेत, आवश्यक त्या सूचना केल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शेळके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.शशांक कदम, डॉ. सूर्यवंशी, आरोग्य अधिकारी डॉ. रवि कुमार करवंदे, औषधी निर्माण अधिकारी डॉ गणेश चव्हाण, सर्व समुदाय आरोग्य परिचारिक यांनी अपार मेहनत घेतली, कर्मचारी वर्ग व आशाताई वर्कर यांच सुध्दा खुप मोठा योगदान लाभलं होत.
आणि आज गिरगाव नगरीचे नाव राज्यात, देशात घेऊन जाणाऱ्या सर्व डॉ. व कर्मचारी यांची अतिशय अतोनात मेहनत घेऊन आरोग्य वर्धनीस विविध अशा आरोग्य सेवा देत रंगून आली आहे.
पहिल्या वैद्यकिय अधिकारी यांच्या पासुन ते विद्यमान वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सर्व स्टाफ यांच्या पर्यंत रुग्ण यांची प्रति असलेली संवेदनशीलता हि वाखवण्या जोगी आहे, स्वच्छ्ता, रहाणीमान, आरोग्य केंद्राच्या परिसरातील हिरवळ दाट झाडी झुडपे हि मनमोहित करणारी ठरली आहे.
आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गिरगाव गावाला प्रसिद्ध होण्याचा मान मिळाला तो वैद्यकीय सेवेतील अधिकारी डॉ. व अपार मेहनत घेणाऱ्या कर्मचारी स्टाफ मुळेच हा योग गिरगाव ग्रामपंचायत सरपंच यांच्या कार्यकाळात आला, पण याची पायाभरणी करण्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचं देखील कार्य प्रयत्नशील ठरले आहे. भविष्यात आणखी आरोग्य सेवेचे साधन सामग्री सुविधा निर्माण होण्यासाठी आवश्यक आणि प्रामाणिक प्रयत्न होतील यात तिळ मात्र शंका नाही.
ॲक्टिव्ह मराठी न्युज साठी विभागीय प्रतिनिधी रवि कुंटे वसमत नगर, हिंगोली.नांदेड, परभणी







