Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

कविवर्य रामदास भालेराव यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन.

0 1 4 7 2 7

कविवर्य रामदास भालेराव यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पारनेर प्रतिनिधी दि 30 नोव्हेंबर ढवळपुरी येथील सेवानिवृत्त पदवीधर मुख्याध्यापक रामदास भालेराव यांच्या ‘उन्मीलन’ या काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन माजी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वसंत जमधडे यांच्या हस्ते आश्रमशाळा ढवळपुरी येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ढवळपुरीच्या सरपंच सौ नंदाताई भागाजी गावडे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. विजयकुमार पोटे, प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा. डॉ. अंकुश काळे, प्रा. किरण मढावी, पत्रकार बाजीराव खांदवे, पत्रकार दिपक मेढे तसेच ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र व्यवहारे, सुखदेव चितळकर, दिप्ती भालेराव, संभाजी ढेकळे, मुख्याध्यापक संदीप महांडुळे, मुख्याध्यापक बापूसाहेब रुपनर, हिरामण भालेराव, बाजीराव थोरात, डॉ. पियुष पोखरणा, तुषार साळवे, बाळासाहेब गवळी, खुदा शेख, संपत भालेराव, ॲड. प्रविण जमधडे, विमल भालेराव, सुशिला भालेराव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. वसंत जमधडे म्हणाले की, ढवळपुरी सारख्या ग्रामीण भागातील एक मुख्याध्यापक ३० वर्षांपूर्वी सुंदर अशा कविता रचून त्याचे काव्यसंग्रह तयार करतो, हि अभिमानाची गोष्ट आहे. या कविता ह्रदयाला भिडणाऱ्या आहेत. या कविता सुजाण नागरिकांनी समजून घेणे गरजेचे आहे.
प्रा डॉ विजयकुमार पोटे म्हणाले की, कविवर्य रामदास भालेराव यांनी आतापर्यंत अनेक कविता रचल्या असून त्यांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. रामदास भालेराव हे स्वतःच्या जीवनाशी, परिस्थितीशी व अनुभवांशी अधिक प्रामाणिक आहेत असे त्यांच्या कवितांमधून समजते. त्यांच्या कवितेचा जन्मच असा त्यांच्या जगण्यातून झाला आहे. उन्मीलन कविता संग्रहातून कवी वाचकांचे अंतकरण हेलावून सोडतो. यावेळी प्रा. सिद्धार्थ कांबळे, सुखदेव चितळकर, बाजीराव थोरात, हिरामण भालेराव यांनीही आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक कृष्णा धुमाळ व लतिफ राजे यांनी केले तर आभार प्रा. वैभव भालेराव यांनी मानले. यावेळी डॉ. वसंत जमधडे व प्रविण जमधडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप केले. याप्रसंगी शिक्षक वसंत काळे, राजाराम वाघ, संतोष पटेकर, प्रशांत पादिर, संजय थोरात, किशोर तळोले, योगेश वाळुंज, प्रदीप महांडुळे, सनी काळे, गणेश लाकूडझोडे, देवका पायमोडे,
संगिता आव्हाड, सगुना पवार, मनिषा गर्जे, रशिदा तांबोळी, संगिता मोरे, आदी उपस्थित होते. ॲक्टिव्ह मराठी न्यूज.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे