Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीने गाजवले देशात महाराष्ट्राचे नाव

पुणे जिल्हा ग्रामीण विभागीय संपादिका दिपाली देवकर एकटी मराठी न्यूज. यवत. दौंड.

0 1 4 7 2 7

 

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीने गाजवले देशात महाराष्ट्राचे नाव

यवत प्रतिनिधी ( विभागीय संपादिका) दिपाली दिवेकर दहावी नॅशनल टॉंग ईल मुडो (मार्शलआर्ट)स्पर्धा नुकतीच तेलंगणा या राज्यामध्ये फायरफॉक्स स्टेडियम मोहिनाबाद रंगा रेड्डी जिल्हा हैदराबाद या ठिकाणी पार पडली
ही स्पर्धा टॉंग ईल मुडो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत व फिट इंडिया दिल्ली ओलंपिक यांच्या मान्यतेने 13 ते 15 डिसेंबर या दिवशी पार पडल्या
यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातील ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी ने महाराष्ट्राचे नेतृत्व केले व त्या ठिकाणी सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी एकूण 11 राज्य सामील झाले होते त्यामध्ये हरियाणा दिल्ली पंजाब गुजरात मध्य प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक केरळ ओडिसा राजस्थान ही राज्य सामील झाली होती व विद्यार्थ्यांची संख्या चारशे अंशी एवढी होती तरीही ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे नावलौकिक करत या स्पर्धेमध्ये घवघवीत व अलौकिक असे यश संपादन केले या स्पर्धेसाठी महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून यश बारवकर सर व सचिव प्रवीण होले सर तसेच महाराष्ट्र प्रशिक्षक गणेश घुगे सर
व महाराष्ट्र कोऑर्डिनेटर मॅनेजर म्हणून समाधान दाणे सर यांनी काम पाहिले
यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त प्रयत्न करून यश संपादन केले यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे
सुवर्णपदक
कांचन नेवसे अनुराधा निकम समृद्धी गायकवाड क्षितिज गायकवाड रोशनी हजारे
रजतपदक
ऋत्विक कुंभार साईराज राजपूत अनुष्का कांबळे आर्य ढेरे
कांस्यपदक
रुद्र आहेरकर क्षितिज कुंभार अंश यादव अर्जुन वाघमारे
आदिती भोसले रोनक शिंदे
सार्थक गायकवाड
तपास्य शेळके साद शेख
आर्यन शेलार
ईश्वर ओव्हाळ सुकशांत हंगारगे
प्रतिक हंगारगे विनायक दुर्गे
वैष्णवी रतनवार कार्तिक सितापराव यश शिंदे
समृद्धी कांबळे सोनाक्षी खिलारे
प्रतिक बनकर सिद्धार्थ गोरखे यश आढाव
या सर्व मुलांनी यश संपादन केले
ही सर्व मुले ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी चे विद्यार्थी असून गेली दोन ते तीन वर्ष सराव करत आहेत आणि या सरावाच्या जोरावर यांनी भारताच्या पटलावर महाराष्ट्राचं नावलौकिक केले
या सर्व मुलांना प्रशिक्षण समाधान दाणे सर गणेश घुगे सर आकाश कसबे सर यांनी केले तसेच तसेच टॉंग इल मो डू महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यश बारवकर व मोलाचे मार्गदर्शन हे टॉंग इल मो डू महाराष्ट्र राज्याचे सचिव प्रवीण होले सर यांनी केले स्वगावी परतल्या वरती सर्व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले व युवा उद्योजक पराग कुंभार कैलाश शेलार महाराष्ट्र पोलीस सारिका यादव प्रियंका दाने महाराष्ट्र पोलीस रूपाली टिंगले महाराष्ट्र पोलीस संदीप टेंगले सर डॉक्टर निलेश लोणकर केडगाव ग्रामस्थ बोरीपारधी ग्रामस्थ व यवत ग्रामस्थ
यांनी मुलांचे व ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अँक्टिव्ह मराठी न्यूज. यवत.

5/5 - (3 votes)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे