Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

उपचारासाठी आलेल्या महिलेवर वारंवार बलात्कार; वरवंड येथील डॉक्टरला अटक.

पुणे जिल्हा ग्रामीण विभागीय संपादिका दिपाली दिवेकर अँक्टिव्ह मराठी न्यूज. पुणे

0 1 4 7 2 7

उपचारासाठी आलेल्या महिलेवर वारंवार बलात्कार; वरवंड येथील डॉक्टरला अटक

वरवंड : ओळखीच्या डॉक्टरकडे पाठीवरील गाठीच्या औषधोपचारासाठी गेलेल्या महिलेवर दवाखान्यात व अन्य ठिकाणी बलात्कार करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली असून सुनिल नामदेव झेंडे (मूळ रा. दिवे, ता. पुरंदर, पुणे, सध्या रा. वरवंड, ता. दौंड, पुणे) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रहात असलेल्या घराशेजारी आरोपी डॉक्टरचा धन्वंतरी ऍक्यूप्रेशर सेंटर नावाचा आयुर्वेदिक दवाखाना आहे. सदर पीडित महिला पाठीवरील गाठीच्या उपचारासाठी सुनिल झेंडे याच्या दवाखान्यात दि. 21 ऑगस्ट 2024 रोजी गेली असता त्याने तिला जवळ ओढून मिठी मारली. त्यावेळी पीडितेने तुम्ही हे असे काय करताय, मी माझ्या घरातल्या लोकांना सांगेन असे सांगितले असता तू मला आवडतेस, आपण दोघे फिरायला जावू असे आरोपीने म्हणताच पीडितेने त्यास नकार दिला. तेव्हा आरोपीने पीडितेस आतील खोलीत बळजबरीने ओढत नेत तू जर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या नवऱ्याला एकाचे दोन करून सांगेन असे म्हणत बलात्कार केला व याबद्दल कोणाला काही सांगू नकोस नाहीतर तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली.
त्यानंतर आरोपीने पीडितेवर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. तसेच घडला प्रकार घरी सांगण्याची धमकी देत पैशाची मागणी केली. त्यामुळे पीडितेने घाबरून घरात न सांगता अडीच तोळ्याचा राणीहार आरोपीस परस्पर दिला. सदर राणीहार परत मागितला असता आरोपीने देण्यास नकार दिला व राणीहार पाहिजे असल्यास माझ्याशी शारीरिक संबंध ठेव अशी धमकी दिली. त्यामुळे आरोपीच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलीस चौकी गाठत आरोपीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली.
सदर पीडित महिलेची तक्रार ऐकून घेत पाटस पोलिसांनी आरोपी डॉक्टर सुनिल झेंडे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता 16 डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा अधिक तपास पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करत आहेत. ॲक्टिव्ह मराठी न्यूज.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे