Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

उघड्या रोहित्राला”संरक्षण-कवच” बसवा – अनुसंगम शिंदे

उत्तर विभागीय उपसंपादक प्रशांत जोशी ॲक्टिव्ह मराठी न्यूज.क्टिव्ह मराठी न्यूज राहुरी

0 1 4 7 2 7

उघड्या रोहित्राला”संरक्षण-कवच” बसवा – अनुसंगम शिंदे

राहुरी(प्रतिनिधी) नाना जोशी दि.20डिसेंबर … शहरातील प्रगती विद्यालयासमोर असलेल्या उघड्या डीपीला “संरक्षण-कवच” बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुसंगम शिंदे यांनी उपकार्यकारी अभियंता श्री.बार्से यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे भर पेठेत असलेल्या या उघड्या डीपी पासून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांची डीपी समोरील रस्त्यावरून ये-जा चालू असते.
प्रगती विद्यालयासमोरील मैदानात दलित-आदिवासी समाजाच्या लोकांची वस्ती आहे. त्या वस्तीतील लहान-लहान मुले मैदानावर खेळत असतात व त्यांचीही वर्दळ या डीपीच्या आसपास असते.भविष्यात काही हानी झाल्यास त्या होणाऱ्या घटनेला जबाबदार कोण?
तरी एम.एस. ई. बी. ने लवकरात-लवकर या उघड्या डीपीला संरक्षण कवच बसवावे, अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी

.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे