Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगराजकिय

प्रत्येक तालुक्यात दिव्यांगांसाठी शिबिरे घ्या. खासदार निलेश लंके यांची मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्याकडे मागणी.

विभागीय उपसंपादिका संगीता खिलारी अँक्टिव्ह मराठी न्यूज अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

प्रत्येक तालुक्यात दिव्यांगांसाठी शिबिरे घ्या. खासदार निलेश लंके यांची मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्याकडे मागणी*
अँक्टिव्ह मराठी (प्रतिनिधी) संगीता खिलारी दिनांक 19 डिसेंबर. अहिल्यानगर. सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने समाजातील दुर्लभ घटकांसाठी आयोजित करण्यात येणारी विशेष शिबीरे नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात दिव्यांग बांधवांसाठी शिबिरे आयोजित करण्याचे मागणी खासदार निलेश लंके यांनी सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.* सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने समाजातील दुर्लभ घटकांसाठी त्यांची कौशल्य व क्षमता वाढविण्यासाठी तसेच त्यांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करण्यासाठी विविध योजना व कार्यक्रम राबविले जातात. या योजना तसेच कार्यक्रम मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात राबविण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचनासंबंधीत अधिकाऱ्यांना सूचना देण्याची मागणी खा. लंके यांनी केली. विविध योजनांची माहिती वीरेंद्र कुमार यांना दिली. डॉक्टर विनय कुमार यांना खा. लंके यांनी दिव्यांगांसाठी केलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोना संकटात त्यांनी हजारो रुग्णांना दिलेल्या जीवनाचीही मंत्री वीरेंद्र कुमार यांनी दखल घेत हे काम देशवासीयांच्या कायम लक्षात राहील.अशी टिपणी केली खा. लंके यांनी केलेल्या मागणीवर कार्यवाही करण्याची ग्वाही मंत्री वीरेंद्र कुमार यांनी दिली. अँक्टिव्ह मराठी न्यूज.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे